|
वि. १ पुराणा ; प्राचीन ; पुरातन ; अर्वाचीन काळचा नव्हे असा . आतां जुनीं माणसें बहुधा रहिलीं नाहींत . २ फार दिवस वापरलेली ( वस्तु ); झिजलेला ; फाटलेला ( जिन्नस ). ३ समाप्त होऊन ज्यास बराच काळ झाला आहे असा ( व्यापार इ० ). तुझे पंक्तिचे जेवणारे जेवून उटून जुने झाले , तरी तुझें जेवण होतच आहे . [ सं . जीर्ण ; प्रा . जुण्ण . गु . जुनू ] ०खोड पु. दणकट ; चिवट ; टणक , सशक्त ( म्हातार्या माणसास लावतात ) जुनाट - वि . १ जुना ; प्राचीन ; फार दिवसांचा ; जुन्या काळचा . आतांचे मनुष्यापेक्षां जुनाट मनुष्य प्रामाणिक . २ पक्का ; पक्व ( बुध्दि , विचार , अनुभव , झाड ). या झाडांतलें . जुनाटलें झाड पाहून तोडा . ०पाना वि. बराच जुना ; जुनापुराणा ; वापरलेला ; फाटलेला ( कापडा , भांडें , घर ). ३ जुना अर्थ ३ पहा . ०पापी वि. धूर्त , शहाणा ( म्हातार्याबद्दल वापरतात ). ०पुराणा वि. १ जुनवट ; जीर्ण ; थकलेला . २ वापरलेला ; झिजलेला ; जुनापाना . ३ वडील ; ज्येष्ठ ; फार दिवसांचा ( माणूस ). ४ बहुतकाळचा ; जुना ( कामदार , हुद्दा , धंदा , व्यापार ). [ जुना + हिं . पुराणा ] ०जुनावणें अक्रि . १ जून होणें ; पक्कें होणें ; स्थापित होणें ; बळावणें ; दृढता पावणें ( वस्तु , झाड , बुध्दि , अभ्यास , बातमी , रोग इ० ). २ ( वाईट अर्थानें ) तारुण्यांतील जोर जाणें ( बुध्दीचा ); उतरत्या कळेस लागणें , जुनेरें , जुनेर - न . ( कों . ) जुनें वस्त्र . ( विशेषत : बायकांचें जुनें लुगडें ).
|