Dictionaries | References

घरोबा

   
Script: Devanagari

घरोबा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Friendly relation or connection; brotherliness or neighborliness. 2 Among women. Domestic duties.

घरोबा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Friendly relation or connection; brotherliness or neighbourliness.

घरोबा     

ना.  कौटुंबिक स्नेह , घसट , जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध , प्रेम , शेजार ;
ना.  ऐक्यभाव , बंधुभाव ;
ना.  लग्न , विवाह .

घरोबा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वस्तुतः एका घरातील नसूनही मैत्रीमुळे झालेला जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध   Ex. रामरावांचा आणि आमचा घरोबा खूप जुना आहे.

घरोबा     

 पु. १ वस्तुत : एका घरचे नसतां मित्रपणामुळे घरच्यासारखा झालेला स्नेहभाव ; घरच्या माणसासारखा जिव्हाळयाचा स्नेहसंबंध ; एक्यभाव ; बंधुभाव ; भाईबंदी ; भाइचारा ; एकमेकांकडे जाणें - येणें ; शेजारप्रेम . तारुण्य रासभस्त्रियेपासीं । तिचा घरोबा वाहे शिशीं । - भारा , वाल ९ . ६२ . २ ( बायकी ) घरकाम ; गृहकृत्य ; घरांतील कारभार . त्वां आपला चालवितां घरोबा । धरूं नये किंचितमात्र लोभा । - सारुह ७ . १२० . ३ प्रपंच ; संसार ; गृहस्थाश्रम . घरोबा मांडिला दंडकाधारे । वाढली बाइको उपजलीं पोरें । - दावि ४० . ४ ( ल . ) लग्न ; विवाह ; घरठाव . ( क्रि० करणें . ) बायकोनें दुसरा घरोबा सोनाराशीं केला . - थोमारो २ . १५३ . [ घर + ओबा प्रत्यय , तुल० गु . घरोबो ]

घरोबा     

घरोबा वाढणें
फार येणें जाणें असणें
दाट परिचय होणें. ‘त्‍याचा परस्‍पर घरोबा इतका वाढलेला होता की, शास्‍त्रीबुवांची उपवर मुलगी नमी कितीकदां मावशीकडे येऊन राही.’-जादुगार पृ. ३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP