|
न. न. १ दोरा ; धागा ; सूत्र . २ नाकांत ( नथ घालण्यापूर्वी भोंक रहावें म्हणून ) घालावयाचा दोरा , धागा ( त्यावरून ). ३ - वि . सुताप्रमाणें सरळ , नीट . [ सं . सूत्र ] सुतानें चंद्राला ओंवाळणें - शुध्द द्वितीयेच्या संध्याकाळीं भाविक लोक आपल्या वस्त्राचें सूत ( दशा ) काढून तें चंद्राला अर्पण करतात आणि तूं जसा पुन्हां नवा झालास तशीं आमचीं वस्त्रें नवीं होऊं दे अशी प्रार्थना करतात त्यावरून . सुतानें सुत लागणें - एका गोष्टीच्या योगानें दुसरी गोष्ट समजणें . ( गो . ) सुतान डोंगर खेडावप - डोंगराला सूत वेढणें . सुतानें स्वर्गास गांठणें , सुतानें स्वर्गास जाणें , सुतानें स्वर्गास चढणें - एखाद्या गोष्टीचा यत्किंचित् अंश समजल्यानें बुध्दिप्रभावानें ती गोष्ट पूर्णपणें तर्कानें जाणणें . सुतास लागणें - सुरळीतपणें चालू लागणें . सुतासाठीं मणि फोडणें बरोबर नाहीं - क्षुल्लक वस्तु बचावण्यासाठीं मूल्यवान वस्तूचा नाश करणें योग्य नाहीं . सुतासुतानें - लहरीनें ; कलानें . पु. वि. जन्मलेला ; झालेला . [ सं . ] ०काडी स्त्री. ( कोष्टी ) सूत गुंडाळावयाची काडी . बाप क्षत्रिय व आई ब्राह्मण अशांची संतति अशी जात व तींतील व्यक्ति ; यांचा धंदा सारथ्याचा .( त्यावरुन ) धागा ; दोरा ; तार ; रेषा , तंतु ( विशेषतः कापसाचा ). ०कुडें न. ( गो . ) सुताचें गुंडाळें . सुतड गोतड जुळणें , सुतड गोतड असणें - एकमेकांचें गुह्य जमणें ; ( लांबचा ) संबंध असणें . सारथी . ( ल . ) संधान ; संबंध ( आश्रय , आधार इ० चा ); मार्ग ; उपाय ( मिळविण्याचा , संपादण्याचा , साध्य करण्याचा ) नात्यागोत्याचा संबंध . ०णें अक्रि . १ ( व . ) एखाद्या वस्तूभोवतीं सूत गुंडाळणें . २ ( ल . ) मारणें ; ठोकणें . नासके फळ . सुतार . जखम इ० मध्ये धाग्याप्रमाणे आढळणारा एक जंतु . भाट ; पुराणिक . [ सं . ] ०पुती पुतळी - स्त्री . ( कर . ) १ कापसाचा ( जखमेवर लावावयाचा ) मणी . २ स्त्रियां मंगळागौर , शिवामूठ इ० पूजेमध्यें वस्त्रांकरितां विशिष्ट आकृतीचा कापूस करून वाहतात ती . कापडाचे काम ; वीण . ०उवाच उद्गा . सगळ्या पौराणिक कथा वरील जातींतील एका पुराणिकाने सांगितल्या आहेत म्हणून प्रत्येक कथेच्या प्रारंभी हा शब्द असतो , ( यावरुन ) प्रारंभ करणे . ०पोत न. कापडाची वीण , पोत . सुतर फेणी - स्त्री . एक गुजराथी खाद्य पदार्थ . सुतरा - वि . शहाणा ; धूर्त , तीक्ष्ण . सुतवणें , सुतविणें - अक्रि . १ सुतांत गुंफणें ; ओवणें ; गोवणें . २ भोंवती सूत गुंडाळणें ( संक्रातीचीं सुगडें , वधुवर , पिंपळ इ० च्या ). विप्रीं त्या सुतवूनियां निज करीं ते कंकणें बांधिती । - अकक २ सी . स्व . १०२ . लग्नांतील तेलफळ , रुखवतांतील लाडू इ० स सूत गुंडाळणें . सुतळी , सुतळ - स्त्री . सुताची जाड दोरी . ०ळया पु. एक प्रकारचा लगाम . सुताचा तोडा - पु . १ सुताचा तोडलेला तुकडा , दोर्याचा तुकडा . २ ( ल . ) कःपदार्थ ; अत्यंत हलक्या किंमतीची वस्तु . सुताड पुनव - स्त्री . ( गो . ) श्रावणी पौर्णिमा . सुताडा - पु . कापसाच्या सुताचें विणलेलें जाड वस्त्र ( लुगडें इ० ), झोर्या , बोर्या . सुताडें - न . १ ( निंदार्थी ) सुताडा . २ फार दूरचें नातेंगोतें , आप्तसंबंध ; नात्यागोत्यांचें जाळें ; घरोबा ; निकटचा संबंध . सुताडेंगुताडें , सुताडेंगोताडें , सुताडेंगाताडें , सुताडगुताड - १ सुताडें अर्थ २ पहा . २ दूरचे व्यापारी संबंध ; एकमेकांचे गुंतागुंतीचे व्यवहार किंवा संबंध . ३ सुतांची गुंतागुंत . [ सूत + गुतणें , किंवा गोत ] सुतार बांधणें - ( कर . ) पतंगास दोरा बांधण्यासाठीं फांसा करणें . सुतारा - पु . ( कोष्टी ) मागाचा एक भाग ; गुलडयाशीं समांतर असलेली काठी . सुती - स्त्री . १ प्रवेश , विस्तार - शर . २ ( व . ) एखाद्यावर दाब , वजन पाडणें ; एखाद्याच्या धाकानें निमूटपणें वागणें , ऐकणें . - वि . १ कापसाच्या सुताचें केलेलें , तत्संबंधीं . २ ( ल . ) सरळ ; नीट ; बिनचूक ; पध्दतशीर ; चोख . ३ ओळीनें , समपातळींत असलेलें , कुशलतेनें समासांत ) कापडाचा पोत , वीण , तलमपणा दाखविणें . जसें - एकसुती , दोन सुती , जाड सुती , बारीक सुती . सुतीव - वि . वरील अर्थ २ , ३ , पहा . सुतेरा - पु . कोळी नांवाचा किडा व त्याचे गुदापासून उत्पन्न होणारा तंतु , दोरा . ( ल . ) समेट ; सेहभाव ; मित्रत्वाचा संबंध . अगदी थोडी लांबी दाखविणारे माप ; एक अष्टमांश इंच . लगाम पु. एक प्रकारचा लगाम . सुताचा तोडा - पु . १ सुताचा तोडलेला तुकडा , दोर्याचा तुकडा . २ ( ल . ) कःपदार्थ ; अत्यंत हलक्या किंमतीची वस्तु . सुताड पुनव - स्त्री . ( गो . ) श्रावणी पौर्णिमा . सुताडा - पु . कापसाच्या सुताचें विणलेलें जाड वस्त्र ( लुगडें इ० ), झोर्या , बोर्या . सुताडें - न . १ ( निंदार्थी ) सुताडा . २ फार दूरचें नातेंगोतें , आप्तसंबंध ; नात्यागोत्यांचें जाळें ; घरोबा ; निकटचा संबंध . सुताडेंगुताडें , सुताडेंगोताडें , सुताडेंगाताडें , सुताडगुताड - १ सुताडें अर्थ २ पहा . २ दूरचे व्यापारी संबंध ; एकमेकांचे गुंतागुंतीचे व्यवहार किंवा संबंध . ३ सुतांची गुंतागुंत . [ सूत + गुतणें , किंवा गोत ] सुतार बांधणें - ( कर . ) पतंगास दोरा बांधण्यासाठीं फांसा करणें . सुतारा - पु . ( कोष्टी ) मागाचा एक भाग ; गुलडयाशीं समांतर असलेली काठी . सुती - स्त्री . १ प्रवेश , विस्तार - शर . २ ( व . ) एखाद्यावर दाब , वजन पाडणें ; एखाद्याच्या धाकानें निमूटपणें वागणें , ऐकणें . - वि . १ कापसाच्या सुताचें केलेलें , तत्संबंधीं . २ ( ल . ) सरळ ; नीट ; बिनचूक ; पध्दतशीर ; चोख . ३ ओळीनें , समपातळींत असलेलें , कुशलतेनें समासांत ) कापडाचा पोत , वीण , तलमपणा दाखविणें . जसें - एकसुती , दोन सुती , जाड सुती , बारीक सुती . सुतीव - वि . वरील अर्थ २ , ३ , पहा . सुतेरा - पु . कोळी नांवाचा किडा व त्याचे गुदापासून उत्पन्न होणारा तंतु , दोरा . लांकूड कापण्यासाठी त्यावर खूण करावयाची दोरी . चातुर्य ; शहाणपण . [ सं . सूत्र ] ( वाप्र . ) सुताचा तोडा - दोर्याचा तुकडा . ( ल . ) क्षुल्लक रकम , वस्तु . शंभर रुपये दिले त्यांपैकी सुताचा तोडा हाती लागला नाही . सुताने सूत लागणे - एका गोष्टीच्या शोधाने दुसरीचा शोध लागणे . सुताने स्वर्गास जाणे - स्वर्ग गांठणे - किंचित सुगावा लागतांच त्यावरुन तर्काने एकंदर सर्व गोष्टींचे स्वरुप ओळखणे . सुतास ( सूती ) किंवा सुतीपाती लागणे - सुरळीतपणे चालू लागणे ; नीट व्यवस्था लागणे . सुतास - सुती - सुतीपाती चालणे , लावणे - सुरळीत असणे , लावणे . ०बांधणे देणे ( स्नेहदर्शक चिन्ह म्हणून एखाद्यास ) पागोटे देणे . ०असणे स्नेहसंबंध असणे ; जुळते असणे . ०जमणे मैत्री जमणे . ( नाकाशी ) सूत धरणे ( मरणोन्मुख अवस्थेत श्वासोच्छवास चालला आहे की नाही हे पाहण्यास नाकाशी सूत धरतात यावरुन ) मरणोन्मुख अवस्था . सूत नसणे मैत्री नसणे . सामाशब्द - ०काडी स्त्री. ( कोष्टी ) जिच्या भोवती सूत गुंडाळलेले असते ती काडी ; गणा ; रिकांडी . सुतणे सक्रि . वेष्ट्णे . - शर . ०परमे परम्याचा एक प्रकार ; लघवीतून सुतासारखे जंतू जाणे . ०पाड पु. न सणंगाची वीण व किंमत . हे सणंग सुतापाडास बरे आहे . ०पात पोत पु . कापडाचे विणकाम , बनावट ; वीण .
|