Dictionaries | References च चालला तर गाडा, नाहीं तर खोडा Script: Devanagari Meaning Related Words चालला तर गाडा, नाहीं तर खोडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी गोष्ट अशी असते कीं, ती व्यवस्थितपणें चाललेली असते तोपर्यंत ठीक असते व तिची मदत होतेपण एकदां का ती बिघडली म्हणजे मूळ काम बाजूस राहून त्या आनुषांगिक उपस्थित झालेल्या अडचणीचे निवारण करण्यात वेळ जावयाचा व तिच्यामुळे काम लवकर होण्याचे बाजूस राहून अधिक खोळंबाच व्हावयाचा. एखादा जुना गाडा असला म्हणजे तो नीट सरळ जात असेल तोपर्यंत ठीक. एकदां का त्यांत काही बिघाड झाला की तो नीट करण्यामध्येच सारा वेळ जावयाचा व तो गाडा नसता घेतला तर बरे असे म्हणण्याची पाळी यावयाची. उदाहरणार्थ, एखाद्या वृद्ध मनुष्यास बरोबर घेऊन कोठे जावयाचे झाले तर त्याची मदत, त्याची प्रकृति वगैरे ठीक असेल तर होण्याचा संभव पण तीच जर वाटेत बिघडली तर मूळ काम बाजूस राहून हे नसतेच लचांड पाठीस लागले असे म्हणावयाची वेळ यावयाची. गाडा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP