ठकडा , ठकडी , ठकडें , ठकडया वि . लुच्चा ; सोदा ; फसविणारा ; मोठा ठक . म्हणती ठकडा रे कान्हा
। - तुगा २३० . अवघ्या जातीमध्यें ठकडा सोनार । त्या घरीं व्यापार
झारीयाचा .
ठकडेपणा न . फसवेगिरी . तें ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रति सर्वथा । - एभा २९ . ७२८ .
न . ( काव्य ) तटस्थपणा ; आर्श्चयामुळें येणारी एकाग्रता ;
आश्चर्य ;
भूल ; विस्मृति ; दिडमूढता . ( क्रि० पडणें ).
उभा जानकीरमण । वधुसहित
सुलक्षण । उभयरूपाचें बरवेपण । पाहाण्या ठक पडिलेसें । - वेसीस्व १० . १२१
. - वि . तटस्थ . [ सं . स्थग , हिं . ठक ; ठग ]
म्ह० ठकास महाठक भेटला .
पु. लुंच्चा , फसव्या , धूर्त मनुष्य . ठकउनि लुटावया पटु ठक जेविं ससार्थवाह सार्थातें । - मोसभा ६ . ८९ .
ठकणा , ठकणी वि . ठकडा पहा . कोण मिळाली ठकणी - अफला ७८ .
ठकणें अक्रि आश्चर्यचकित होणें . पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें . । -
ज्ञा ७ . २०० . [ हिं . ठकना ]
०णूक स्त्री. फसवणूक ; फसगत ; लुच्चेगिरी ; लबाडीनें केलेली नागवणूक .
ठकणें अक्रि . - फसणें ; फसले जाणें ; दगा होणें ; निराशा
होणें ; बुडणें ( धंद्यात ) चुकणें . माझी ठकली वो बुध्दि । - कथा १ .
५ . १४२ .
- ( चुकीनें ) थकणें ; दमणें ; श्रम होणें किंवा पावणें ;
बंद राहणें ; सपणें ; सरणें ; अंतरणें . जरी राजा घरासि ये । तरी
बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राध्द न ठके । - ज्ञा १७ . १८६ .
ठकणें सक्रि . ( कों . ) दगा देणें ; नाडणें ; ठार मारणें ( असावध
किंवा पूर्व तयारी नसतां , सापाच्या दंशानें किंवा चोरांनीं हल्ल्यांत ).
०धंदा पु. फसवेगिरी ; सोदेगिरी ; लुच्चेगिरी ; लुच्चेपणाचा व्यवहार .
०बाज वि. ठक अर्थ १ पहा . [ हिं . ]
०बाजी स्त्री. १ ठकधंदा पहा . २ ( कायदा ) कोणा मनुष्यास फसवून त्याचा माल देण्याविषयीं त्याचें मन वळविणें . [ हिं . ]
०वणी ठकवणूक - स्त्री . ठकधंदा पहा .
०वरा वि. ठकविणारा ; लुच्चा . ठक अर्थ १ पहा .
ठकवा , ठकव्या , ठकाऊ , ठकारू , ठकावू , ठकू वि . ठकवरा पहा .
ठकवाठकव स्त्री . नानाप्रकारची फसवणूक . ठकवणी पहा . [ ठकविणें ]
०विणें सक्रि . फसविणें ; लबाडी करणें . सुरांअसुरांतें ठकवूनी । महादेव मोहिला । - एरुस्व २ . १९ . [ ठकणें ]
०विद्या,ठकूविद्या स्त्री फसविण्याची कला ; कपटयुक्ति ; लबाडी ; ठग लोकांचें चातुर्य .
०व्याज न. फसवून घेतलेलें व्याज ; अमर्याद व्याज .
०व्यापार न. कपटाचा व्यापार , धंदा उद्योग .
०सौदा पु. - गिर्हाईकास ज्या वस्तूनें किंवा मालानें फसविण्यांत आलें तो माल .
- ठकव्यापार पहा .