Dictionaries | References

तरंगणे

   
Script: Devanagari

तरंगणे

 क्रि.  तरणे , पोहणे , वहावत जाणे ;
 क्रि.  कुचंबत राहणे , भिजत ठेवणे , लोंबकळत पडणे ;
 क्रि.  अनिर्णित अवस्थेत असणे , संदिग्ध असणे .

तरंगणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे   Ex. पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते.
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmউপঙা
bdगोजाव
benভাসা
kanತೇಲುವುದು
kasییٖران
kokउफेवप
malഒഴുകുക
nepउत्रिनु
oriଭାସିବା
panਤੈਰਨਾ
tamநீந்து
telతేలుట
urdتیرنا , اترانا
 verb  पाण्याच्या पृष्ठभागावर येणे   Ex. पुरात बुडून मेलेल्या लोकांचे शव पाण्यावर तरंगत होते.
ENTAILMENT:
दिसणे
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
asmওপঙা
benভেসে ওঠা
gujઊભરવું
kanಮೇಲೆಬರುವುದು
kasہیوٚر کھَسُن
kokउफेवप
malപൊന്തികിടക്കുക
mniꯇꯥꯎꯈꯠꯂꯛꯄ
nepउत्रिनु
panਉਭਰਨਾ
tamமிதக்க
urdاترانا
 verb  ज्याप्रकारे जीवजंतु पाण्यावर तरंगतात तशा प्रकारे एखाद्या प्राणी किंवा वस्तूचे सहजप्रकारे इकडेतिकडे हलणे किंवा पुढे जाणे   Ex. पतंग हवेत तरंगत आहेत.
HYPERNYMY:
चालणे
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   See : पोहणे

तरंगणे

 अ.क्रि.  १ पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे ; तरणे ; तिरणे ; पोहणे . तरंगावो लागे बुद्धी । विवेकावरी । - ज्ञा १४ . २२२ . २ ( ल . ) बहकणे ; ( बोलताना ) वहावत जाणे ; मुद्दा सोडून भलतेच बोलणे . ३ ( एखादा खटला , वाद इ० ) निकाल न लागता भिजत , लोंबकळत , कुचंबत पडणे . ४ ( मन इ० ) संशयांत , संदिग्ध स्थितीत असणे . ५ भांबावणे ; कुंठित होणे ; थांबणे ; थबकणे . ६ ( एखाद्या व्यक्तीची , गोष्टीची ) अपेक्षा धरुन खोळंबून राहणे ; तिष्ठत बसणे ; मार्गप्रतीक्षा करीत थांबणे . ज्याप्रमाणे वषट्कराचा घोष चालून इंद्रादि देवता सोमपानाविषयी तरंगल्या असतां ... - नि ४१६ . तुमच्यासाठी ही सर्व मंडळी तरंगली . [ तरंग ]
०तरंगायास   - ( एखादे काम इ० ) निकालांत न काढता लोंबकळत ठेवणे ; संदिग्ध स्थितीत पडणे . तरंगविणे - सक्रि . १ ताटकळत , खोळंबून ठेवणे . २ ( कार्य इ० ) लोंबकळत , भिजत ठेवणे . [ तरंगणे ]
लावणे   - ( एखादे काम इ० ) निकालांत न काढता लोंबकळत ठेवणे ; संदिग्ध स्थितीत पडणे . तरंगविणे - सक्रि . १ ताटकळत , खोळंबून ठेवणे . २ ( कार्य इ० ) लोंबकळत , भिजत ठेवणे . [ तरंगणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP