|
पु. १ सोन्याचा , चांदीचा अर्धचंद्राकार , नळकंड्यांच्या आकृतीचा मुलांच्या गळ्यांत , दंडाला , मनगटाला बांधावयाचा एक बारीक दागिना . ह्याने मुलास दृत होत नाही असा समज आहे . कधी कधी हा पोकळ असून यांत मंत्र लिहिलेला कागद , अंगारा असतो . ताइती , ताऊत ही याची लघुत्वरुपे आहेत . २ मुसलमानांच्या थडग्यावरील शवपेटीच्या आकाराचा फुगीर भाग . [ अर . तसवीझ ; तावीझ ; हिं . ताइत ] जिवाचा , गळ्यांतला ताईत - अतिशय प्रीतीचा माणूस ; कंठमणि . कालिदास , भवभूति , बाणभट्ट यांच्यासारखे प्रतिभावान कवि सरस्वतीदेवीच्या गळ्यांतील ताईत होत . - निचं गळ्यांतल्या ताइता तुला मी आंघुळ घालीते । - पला . पु. ( दगदी बांधकाम ). मोटेच्या थारोळ्याचा कण्याखालचा दगड .
|