|
पुस्त्री . १ कलाबतूचें वस्त्र ; सोन्यारुप्याची तार ; कलाबतु . २ ( व . ) सोनें ; पैसा . जर पदरी जर नसला तर तो नर संसारी येऊन बैल । - पला . [ फा . झर = सोनें ] सामाशब्द - उघ . संकेतबोधक अव्यय ; अमुक गोष्ट घडली तर अशा अर्थी पूर्वीची अट , निर्बंध , वस्तुस्थिति दाखविणारें अव्यय . हा शब्द पुढील शब्दांशीं जोडूनहि वापरतात - का , करितां , काय , करून , होऊन जसें - जर का तो आला तर मी देईन . [ सं . यत - यदि - यहिं ] पु. १ ताप २ तापाच्या पुटकुळया , पुरळ . तापानें त्याच्या तोंडावर जर उमटला आहे . [ सं . ज्वर ; प्रा . जर ] ( वाप्र . ) ०करितां उद्गा . जरी ( एखादे वेळीं ); जरी ( एखाद्या रीतीनें ); जरी ( यद्यपि , अथापि ). ०कडी स्त्री. ( कलाबतु काम ) धाग्यांना पीळ देण्यासाठी जिच्यामधून चातीवरून दोरे घेतात ती कडी . ०उतणें ( ताप गेल्यानंतर ) अंगावर . तोंडावर पुरळ उठणें . ०कमर पु. सुवर्णकटिबंध ; कटिसूत्र . - राव्यको २ . १६ . ०जाणें दुखणें येणें ; रोग उत्पन्न होणें . शिवीशाप देताना योजतात . तुझे हातावरून जर जावो . ०तर ( जर आणि तर ) अट ; कार्यकारणभावी बोलणें . मला जरतर नको , काय असेल तें स्पष्ट सांग . ०खाना पु. सुवर्णशाळा . - राव्यको २ . २१ . ०बांधणें ताप नाहींसा होण्यासाठीं मंतरलेला दोरा , गंडा , ताईत हातांत , मनगटांत बांधणें . ०जरियान न. सोनें आणि सोन्याच्या वस्तू ; द्रव्य आणि अलंकार ; कलाबतु आणि कलाबतूचें काम , कशिदा ( समुदायार्थी प्रयोग ). [ फा . झर + झरीन ] ०भरणें होणें - १ अंगांत ताप भरणें . २ ( ल . ) अशक्त , नालायक , अयोग्य होणें ( प्राणि आणि वस्तु यासंबंधानें नकारार्थी अथवा प्रश्नार्थी योजितात ). धोतरजोडयाला वर्षभर टिकायाला काय जर झाला आहे ? तुला चाकरी करायला काय जर भरला आहे ? सामाशब्द - ०करी वि. तापकरी माणूस . ०तार स्त्रीन . १ कलाबतु . २ हलक्या धातूवर सोनें , रुपें , चांदी चढवून तार काढून केलेल्या जरतारीस खोटी जरतार म्हणतात व चांदीवर सोनें चढवून काढलेल्या तारेच्या जरतारीस खरी जर म्हणतात . ०डा पु. जर ; ज्वर ; जरडा , जरंडा भरणें = ताप भरणें . उन्हाळीं जरंडा पावसाळीं विजालवती । - वसा २० . ०तारी वि. कलावतूचें ; जरतार असलेलें ( पीतांबर , पागोटें इ० ). ०दोज पु. कलाबतूचें काम करणारा . [ फा . झरदोज ] ०बंद पु. ताप बंद करावयाचा मंत्र . ०ल पेट स्त्री. तापाची साथ . ०दोजी स्त्री. कलाबतूचें काम . - वि . भरजरी ; जरीचा . खाशा स्वारीकरतां भरगच्ची लोड गाशा किंवा जरदोजी गादीलोड लाविणें . - ऐरा २७ . ०बाब बाफ्त - वि . जरतारी ; भरजरी . जरदोजी पहा . [ फा . ] ०यान न. सोनें , रुपें , इ० द्रव्य ; चांदी - सोन्याचे दागिने . जर जरियान पहा . ०मिना पु. भरजरी मौल्यवान वस्तु ; जर्मीना . जरमिना जरबाब ... आदिकरून अशेष वस्तुजात यांचा उदीम चालवावा - मराआ पृ . २१ . जरीटोपी - स्त्री . एक शिरोभूषण . जरीटोपीस पिंपळपान । - मध्व २५ .
|