|
न. १ धन ; संपत्ति ; मालमत्ता ; पैसा . द्रव्येण सर्वे वशाः = द्रव्याने हवा तो मनुष्य वश होतो . २ वस्तूंतील मूलभूत घटक , तत्त्व , अर्थ , विषय , पदार्थ , प्रकृति . ३ सृष्टीचे मूलतत्त्व . ही तत्त्वे नऊ मानितात . पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश , काळ , दिशा , मन व आत्मा ; पंचभूतात्मक वस्तु . ४ औषध ; औषधी वस्तु . ५ ( व्या .) ज्यास लिंग , वचन , विभक्ति इ० लागतात असा शब्द . याच्या उलट अव्यय . ६ घटक ; अवयव ; अंगभूत पदार्थ ; बाब ; विषय ; मुद्दा . उदा० औषधी - सुगंधी - होम - द्रव्य . ७ ( रसा . ) जागा व्यापणारा व पृथ्वीने आकर्षिला जाणारा पदार्थ , वस्तुः जडपदार्थ . ८ ( पदा ) भौतिक जगांतील वस्तू ज्यापासून बनल्या आहेत ते सूक्ष्म कण प्रत्येकी . ९ ( यंत्र . ) जी इंद्रियगोचर असून जीस काही आकार व वजन असते म्हणजे जीपासून कांही प्रतिबंध होतो ती वस्तु . - यंस्थि १ . १० म्हणजे जीपासून कांही प्रतिबंध होतो ती वस्तु . [ सं . ] द्रव्याचा धूर निघणे - पुष्कळ श्रीमंत असणे ; घरी लक्ष्मी पाणी भरणे . द्रव्याचे उबेने उडी मारणे - पैशाच्या बळावर वाईट , धाडसी काम करण्यास प्रवुत्त होणे . द्रव्याचे धुडके उडविणे - करणे - पैसा उडविणे , नासणे , उधळणे . द्रव्यावर ताव देण - पैसा गिळंकृत करणे , दाबणे . सामाशब्द - ०दृष्टि वि. द्रव्यादृष्ट याचे अपभ्रष्ट रुप ; द्रव्यादृष्ट पहा . ०दृष्टी वि. द्रव्यावर लक्ष देऊन , द्रव्य मिळेल तरच काम करणारा ; स्वार्थी . [ द्रव्य + दृष्टि ] ०वाचक पु. ( व्या . ) नामाचा एक प्रकार ; पदार्थाचे किंवा वस्तूचे नाव ; पदार्थवाचक नाम . उदा० दही , दूध , तेल इ० . ०वाद पु. १ पंच त्तांविषयीचे मत ; सृष्टि पंचभूतात्मक मानणे . ०वादी पु. वरील तत्त्वांचे प्रतिपादन करणारा . ०वान शाली वि . श्रीमंत ; धनवान ०हीन वि. गरीब ; निर्धेन . द्रव्याद्र्ष्ट दृष्टि नस्त्री . नशीबाची , भाग्याची अनुकूलता ; द्रव्ययोग असणारे चांगले नशीब , भाग्य . मोठी विद्या असली , मोठा पराक्रम असला तरी द्रव्यादृष्ट असल्यावाचून पैका कांही मिळायचा नाही . - वि . पैसा मिळण्याचे , संपत्तियोगाचे ( नशीब , भाग्य ). [ द्रव्य + अदृष्ट = नशीब ] द्रव्यानुकूल्य न . संपदा ; समृद्धि ; स्वास्थ्य ; द्रव्यसामर्थ्थ्य . द्रव्येपणा स्त्री . १ द्रव्याची इच्छा ; द्रव्यासाठी धडपड . २ स्वतःच्या पैशावर , मालमत्तेवर प्रेम .
|