|
वि. ९ ही संख्या पहा . [ सं . नव ; बं . नय ; हिं . नौनिव ; लिथु . नौयेस ; स्ला . नोवउ ; हिब्र्यू . नुआ ] ०स्थायीभाव पु. प्रेम , उत्साह , शोक , विस्मय , भय , हास्य , जुगुप्सा , क्रोध आणि निर्वेद ह्या नऊ मनोवृत्ती . [ नऊ + सं . स्थायीभाव ] ०हस्तवाद्ये नअव . झांज , टाळ , चिपळी , करताळ , जलतरंग , घंटा , तास , घुंगुर व घागर्या .
|