Dictionaries | References

पैजेचा विडा उचलणें

   
Script: Devanagari
See also:  पैजेचा विडा उचलून देणें

पैजेचा विडा उचलणें

   एखादें अगदीं अवघड काम, म,ओहेम इ. करण्यास कोण पुढें येतो हें पहाण्यासाठी दरबारांत ताटांट त्याबद्दल विडा मांडीत व जो तो उचलील त्यानें तें काम जिवाच्या मोलें पार पाडणयचें पत्करावें असे मानीत. यावरुन प्रतिज्ञा करणें. विडा पैजेचा उचलूं नको।’- अफला ६०. ‘किर्लोस्कर मंडळीला गाणारें स्त्रीपात्र मिळवून देणें हें त्यावेळीं पैजेचा विडा उचलून देण्याइतकें दुर्घट काम होतें’ -भाउराव कोल्हटकर चरित्र (आ.
   पृ.९) ‘शहाजी भोंसल्याचें बंड मोडीन तरच पुन्हां दिल्लीस परत येईन, असा बादशाही दरबारांत पैजेचा विडा उचलून मी इसमिय्या दक्षिणेंत निघून आलों.’ -शिसं १.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP