Dictionaries | References

उचलणें

   
Script: Devanagari

उचलणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To go with one's daughter and with the people and materials necessary, to the village of the intended husband; there to celebrate the marriage. This is a deviation from decorous usage. उचलून बोलणें or उचलून गोष्ट सांगणें To speak big; to talk high, loftily, vaingloriously &c.
   and put into the hand of, i. e. to swear unto by गणपति &c. उचलून धरणें with ला of o. To dun hard; to worry and torture for payment or for alms;--used of a banker or a beggar. 2 To make high and hard terms; to ask high interest--a banker. 3 With g. of o. To lift up; to take the part of; to espouse and extol or vindicate.

उचलणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Rise; shoot up.
 v t   Raise, to heave or lift up. Undertake. Incite. To snap up furtively.

उचलणें

 अ.  क्रि .
   स . क्रि .
   वर येणें ; वर येण्याचे प्रकार -( अ ) पित्त , पुरळ , फोड , गळवें वगैरे शरीरावर उठणें , उत्पन्न होणें . गळूं कालच उचललें . ( आ ) पाण्यावर लाटा , बुडबुडे उत्पन्न होणें . जैशा उचलती लहरीवरी लहरी - दा ११ . ९ . १७ . ( इ ) जमिनीवर वारुळें , भोमे , उंचवटे तयार होणें . ( ई ) सारवलेल्या जागेवर खरपुड्या , पोपडे येणें ; वरचेवर सारवल्यानें जमीन लवकर उचलत नाहीं . ( उ ) आकाशांत ढग येणें . तेथें प्रळये मेघ उचलले । कठिण घोषें गर्जिन्नले । - दा १३ . ४ . १४ .
   वर करणें - धरणें ; उठावणें . अंगीकारणें ; स्वीकारणें ; पत्करणें ( काम , भाग , भूमिका प्रांत ).
   हातीं घेणें ; यंदा पैशाचें अळमटळम दिसतें आहे , नवें घर बांधावयाचें उचलूं नका लहानपणापासून यानें संसार उचलला . पुढें मूर्तिपूजा हळुहळु आर्यांनींहि उचलली असें दिसतें . - मसाप २ . २ . ११६ .
   वाढणें ; लठ्ठ होणें ; मोठे होणें . हा उकिरडा भारी लवकर उचलला ?
   उत्तेजन देणें ; उभा करणें ; मनांत भरविणें ; चेतविणें ; चेव आणणें ; इरेस पेटविणें ( वाद , मूल , इ . विषयीं ) त्याचे मनांत भाऊबंदांशीं आजच कजिया सांगावा असें नव्हतें परंतु लोकांनीं त्यास उचलला .
   उठावणी करणें . म्हणे पांडवसैन्य उचललें । - ज्ञा १ . ८८ .
   उंच होणें ; वाढणें ; अंकुर फुटून वर येणें . दोन दिवस पाऊस लागतांच झाडें उचललीं .
   लांबविणें ; चोरणें .
   उचलून येणें ; पोटांत अस्वस्थता वाटणें ; ढवळणें ; पित्त वर येणें ; ओकारी येणें ; मळमळणें . कालचे उपोषणामुळें क्षणोक्षणीं उचलतें . उचलून जाणें , येणें - वादाविषयीं , युध्दसंबंधीं आह्वान देणें ; वाद उत्पन्न करणें , ओढून आणणें , सुरुवात करणें ; चढाई करणें . जे जुंझावया उचलोनि आले असती . - गीताचंद्रिका १ . २२ . उचलून जाणें - लग्नास , विवाहास वरपक्षाच्या ठिकाणीं वधूपक्षानें इष्टमित्र आणि सामान यासह जाणें . उचलून बोलणें , गोष्ट सांगणें -
   उचल करणें ; रक्कम घेणें . उचलून आपटणें - वर उचलून खालीं टाकणें ; मोठ्या जोरानें आपटणें ; आदळणें . उचलून देणें -
   बढाई , बाता , झोकणें , मारणें .
   ( तुळशी , बेलपत्रें वगैरे वस्तू हातांत घेऊन ) शपथ घेणें ; कोणाच्या नांवानें ) संकल्प करणें .
   स्वसंतोषानें उक्ती रकम कोणेकास देणें ;
   ताठ्यानें उठून बोलणें .
   वेगळें काढून देणें . तूं आमच्यांत जेवायला आलास तर कसें तरी भागवितां येईल . तुला बोर्डिगांत रहावयासाठीं पांच रुपये उचलून देणें जड जाईल , वाटल्यास जेवणास ये . उचलून धरणें -
   आपला दर्जा न ओळखतां बोलणें . [ सं . उच्चलन ; सिं . उछिलणु ]
   सतावून सोडणें ; धरणें घेऊन बसणें ; खणपटीस बसणें ; तगादा लावणें ; ओढून धरणें ( भिक्षेकरी वगैरेनीं . )
   भारी अटी लादणें ; जबर किंमत , व्याज मागणें ( सावकार वगैरेनीं ).
   एखाद्याचा विशिष्ट पक्ष स्वीकारणें ; जबाबदारी पत्करणें ; अभिमान बाळगणें ; समर्थन करणें ; आधार देणें . म्ह० उचलली जीभ लावली टाळ्याला = विचार न करितां मनास येईल तें बोलणें ; ताळतंत्र सोडून बोलणें .

Related Words

मोळी उचलणें   देवावरची तुळस उचलणें   देवावरचे फूल उचलणें   देवावरचे बेल उचलणें   उचलणें   गंगाजळी उचलणें   गठडी उचलणें   उरापोटावर उचलणें   विडा उचलणें   शिरें उचलणें   शीर उचलणें   गुळें उचलणें   दुमची उचलणें   दगड उचलणें   चूड उचलणें   तुळस उचलणें   टांग उचलणें   बिर्‍हाड उचलणें   बेलभंडार उचलणें   भंवई उचलणें   मेखा उचलणें   नांगर उचलणें   पाठ उचलणें   पाय उचलणें   हात उचलणें   (एखाद्या कार्याची) तळी उचलणें   घोड्यांच्या अनीना अनीना उचलणें   (घोड्याच्या) अनीना उचलणें   शिवावरचा बेल उचलणें   दुःखाचा वांटा उचलणें   जड पारडें उचलणें   यशाचा विडा उचलणें   पापाचा वांटा उचलणें   पाऊल उचलणें, उचलून चालणे   पैजेचा विडा उचलणें   उचलाडेवर   उद्वर्तनऊरु   उचलनी   उच्चालन   समुद्‍वृत्त तारा   उखलाड   उचलणी   काशीची वाट दाखविणें   उखलणें   उचलाऊ   उचलाव   गुळें येणें   यरकाल   देवावरची तुळस काढणें   देवावरचे फूल काढणें   देवावरचे बेल काढणें   सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें   सूर्याचे घोडे दाखविणें   आबदार   कौनी   गपकन   काढघाल   आसन गुंडाळणें   उचलतांपाई   उचलत्यापाई   साजक रोटी   सानक रोटी   जोंधळे   तळी भरणें   डोईवर घेणें   गपकर   गपदिशी   उपाड   उपायीं येणें   उचलपांगडी   उष्ट्रासन   बंगलाट   बंगलाठ   घांटी   गंगाजळी   कांटणें   कासवालागुनु बोंडुळ गेलें   उपायीं   उगारणें   उचक्या   उच्चलन   कैंवार   अवलंबणें   भजनांत दोन पाहारे घेणें   भ्रुकुटी   चंभू   उंचावणें   उचलबांगडी   साजक   तिरडी   झेलणें   चंबू   मोळी   उद्वर्तन   उचकणें   उचल्या   कोलणें   अभ्युत्थान   चांगभला   तंटा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP