Dictionaries | References

घांटी

   
Script: Devanagari

घांटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   होणें g. of s. To lose one's voice: also to lose the power of swallowing.

घांटी

  स्त्री. घसा ; गळा . पूर्वी तुम्हां नाहीं भेटीतरि कां येणें धरिली घांटी । - गीता २ . २२६१ . २ घाट ; कंठमणि ; कंठनाल ; नरडें . तिणें पसरितांचि जाभाडी । हनुमंत सवेग घाली उडी । आकळितां जिव्हा लडबडी । तंव घाटीबुडीं रिघाला । - भारा किष्किंधा १८ . ६८ . [ सं . घाट ] ( वाप्र . )
  स्त्री. साखरेची गांठी . गांठी पहा .
  स्त्री. लहान घंटा ( बैल इ० पशूंच्या गळयांत बांधण्याची ); पितळी लहान घांट , घंटा . [ सं . घंटा ; म . घांट ]
०खालीं   राहणें - शपथ घेण्याचा एक प्रकार ; बेल भंडार उचलणें , देवाचा निर्माल्य उचलणें ह्याप्रमाणेंच देवळाच्या घंटेखालीं उभें राहून खरें असेल तें सांगावें असा प्रघात आहे . घाटीखालीं उभे राहणें , देवावरची बेल - तुळस उचलणें , कृष्णेच्या पाण्यांत उतरणें , हीं साधनें अत्यंत कठिण प्रसंगीं व अज्ञात वृतांतास्तव जुनीं माणसें अमलांत आणीत . - खेया २८ .
०खाऊन   मोठयानें बोलणें ; ओरडून , खेंकसून बोलणें ; जीव खरडून , तोडून , खाऊन बोलणें ; गळा काढून रडणें , ओरडणें ; शिरा ताणून बोलणें ; गळेफोड करणें .
उभे   राहणें - शपथ घेण्याचा एक प्रकार ; बेल भंडार उचलणें , देवाचा निर्माल्य उचलणें ह्याप्रमाणेंच देवळाच्या घंटेखालीं उभें राहून खरें असेल तें सांगावें असा प्रघात आहे . घाटीखालीं उभे राहणें , देवावरची बेल - तुळस उचलणें , कृष्णेच्या पाण्यांत उतरणें , हीं साधनें अत्यंत कठिण प्रसंगीं व अज्ञात वृतांतास्तव जुनीं माणसें अमलांत आणीत . - खेया २८ .
बोलणें   मोठयानें बोलणें ; ओरडून , खेंकसून बोलणें ; जीव खरडून , तोडून , खाऊन बोलणें ; गळा काढून रडणें , ओरडणें ; शिरा ताणून बोलणें ; गळेफोड करणें .
०खाजवणें   ( व . ) घसा खवखवणें
०चिप्पचीप   गळा , आवाज बसणें . २ गळयांतील , घशांतील विकारामुळें गिळतां न येणें .
होणें   गळा , आवाज बसणें . २ गळयांतील , घशांतील विकारामुळें गिळतां न येणें .
०पडणें   ( व . ) आवाज बसणें .
०फुटणें   बदलणें - १ ( मुलगा वयांत आल्यामुळें ) आवाज प्रौढ होणें . २ ( गाण्यांत ) आवाज बसणें ; आवाज घोगरा होणें ; कंठ फुटणें .
०बसणें   ( ना . ) गळयांतील विकारामुळें आवाज बिघडणें .
०वर   ( व . ) जिवावर येणें ; दुष्कर वाटणें . काम मोठें घाटीवर येतें तिच्या .
येणें   ( व . ) जिवावर येणें ; दुष्कर वाटणें . काम मोठें घाटीवर येतें तिच्या .

घांटी

   घांटी (घांटे) खालीं उभे राहाणें
   एक प्रकारची शपथक्रिया. देवळांत देवापुढे बांधलेल्‍या घंटेखाली उभे राहून एखादी गोष्‍ट आपण केली किंवाकेली ते सांगणें
   शपथ घेणें. दिव्याचा एक प्रकार. (गो.) घाटीपोंदा उभे रावप.
   घांटी खाऊन बोलणें
   मोठ्याने बोलणें
   ओरडून खेकसून बोलणें
   जोरजोराने बोलणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP