|
पु. १ गळयाच्या आंतील भाग ; नरडें ; अन्ननलिका . २ श्वासनलिका . ३ आवाज ; कंठध्वनि . त्याचा घसा गोड आहे . [ सं . घस - खाणें , गिळणें ] ( वाप्र . ) पु. राब वाहून नेण्याची बिनचाकी गाडी . - बदलापूर २९४ . घसें पहा . [ घासणें , घसरणें ] ०कोरडा फार वेळ बोलत राहणें ; घसा कोरडा होईपर्यंत एखाद्यास उपदेश , एखाद्याशीं माथाकूट करणें . करणें फार वेळ बोलत राहणें ; घसा कोरडा होईपर्यंत एखाद्यास उपदेश , एखाद्याशीं माथाकूट करणें . ०खाणें घशाशीं घुरघुरणें ; घशांत घरघर आवाज होणें . घसा वाजणें . घसर घसरूं घसा खाणें । घुमघुमोंचि घुमणें । योग्य नव्हे ॥ - दा १४ . ४ . घशाखालीं उतरणें - १ गिळला जाणें ; गिळंकृत होणें . २ ( ल . ) लांच खाल्लेला , लबाडीनें लाटलेला पैसा पचविला जाणें . ३ कबजांत जाणें . पण एतद्देशीय संस्थानें मात्र सरकारच्या घशाखालीं उतरविलीं . - नि . घशांत घालणें - बळकावणें ; गिळंकृत करणें ; ( एखाद्या मालमत्तेवर ) बळेंच हक्क सांगून ( ती ) बळकावणें . दुसर्याचे देश घशांत घालण्याची असुरी लालसा टिकणार नाहीं . - के १४ . ६ . ३० . घशात टाकणें - गिळंकृत करणें ; लाटाणें . सरकारचा विचार इंदूरची इस्टेट घशांत टाकण्याचा होता . - विक्षिप्त ३ . १६४ . घशांत पीक धरणें , घशांत पीक अडकणें - पाऊस न पडल्यामुळें पिकांची , कणसांची वाढ खुटंणें . घशांतून काढणें - खाल्लेला , गिळंकृत केलेला पैसा , चोरलेला माल इ० ओकावयास , परत द्यावयास भाग पाडणें . घशाबाहेर पडणें - १ गिळंकृत केलेली वस्तु , पैसा बाहेर ओकून पडणें . २ ( पिकाच्या पोटरी येणें ; पीक निसवणें , पिकाचें कणीस लोंगर बाहेर पडणें . ०पसरणें ( एखादी वस्तु खाण्याकरितां , गिळण्याकरितां ) आ करणें ; तोंड उघडणें ; अशाळभूतपणानें पहाणें . ०फुटणें ( मुलगा ) वयांत आल्यामुळें त्याचा आवाज , स्वर बदलणें ; आवाजाची कोमलता नष्ट होऊन तो मर्दानी बनणें ; घांटी फुटणें ; घांटी पहा . ०बसणें ( ओरडण्यानें , तेलकट , इ० पदार्थ खाल्यानें ) आवाज घोगरा होणें ; शब्दाचे उच्चार अस्पष्ट होणें . ०वाजणें घोरणें ; ( घसा ) घरघर वाजणें ( प्रयोगांत कर्त्याची षष्ठी असावी लागते )
|