|
न. खेडेंगांव . ग्रामनामवाचक सामासिक शब्दांतील अन्त्य भाग म्हणून येतें . उ० जसें देव + ऊर = देवूर , चंद्र + ऊर = चंदूर . [ सं . पुर , प्रा . ऊर ; का . ऊरु ] न. पु . ऊत ; और ; नदीचा पूर . [ सं . पृ - पूर ; प्रा . ऊर ] पु. स्त्री. पोटावरचा आणि गळ्याखालचा पुढल्या अंगाचा भाग ; छाती . उरु कुहिजेल जळें । आसुवांचेनी ॥ - ज्ञा १३ . ५६० . किंवा व्याघ्र व्याघ्रा भेदी प्रखरें शिलीमुखें उर गा । - मोभीष्म ९ . २४ . उरलेलें ; जास्त झालेलें काम , पदार्थ , गोष्ट ; बाकी ; शिल्लक ; शेष . इतकें आवण एवढ्या खांचरास पुरणार नाहीं असें वाटत होतें ; परंतु पुरुन ऊर आली . या उरींत ( उरलेल्या कापडांत ) एक जाकीट बसेल . ( स्त्रियांचे ) स्तन ; वक्ष : स्थल . तों तों तिचा उर भरींव दिसोनि येतो . - नळ ७० . [ सं . उरस ; प्रा . उर ] म्ह० ऊरीं केश माथां टक्कल = एका बाजूनें मिळविणें व दुसर्या बाजूनें गमावणें . तूट ; उणीव ; उरता या अर्थी . [ उर्वरित सं . उत + ऋ ] ०न - स्त्री . उरणें न पुरणें ; प्रसंगीं कामाला न पुरण्यासारखें किंवा पूरुन न उरण्यासारखें सामान , सामग्री ; उणीव , तूट कमतरता . ०उलणें अतिशय दु : ख होणें . परतेल काय ऐकुनि हें साध्वींचीं उरेंचि उलतिल कीं । - मोवन १२ . ९८ . पूर - स्त्री . उरणें न पुरणें ; प्रसंगीं कामाला न पुरण्यासारखें किंवा पूरुन न उरण्यासारखें सामान , सामग्री ; उणीव , तूट कमतरता . ०काढून - ऐटींत चालणें ; बेमुर्वत वागणें . चालणें - ऐटींत चालणें ; बेमुर्वत वागणें . ०पूर स्त्री. पुरुन उरण्याइतकी सामग्री ; भरपूर ; समृद्धि ; आधिक्य . [ उरणें + पुरणें ] ०सूर स्त्री. ०दडपणें भय , लाज , मत्सर वगैरेनीं धैर्य नाहींसें होणें ; उत्साह नष्ट होणें ; छातीस धक्का बसणें ; निराशा वाटणें . शिल्लक ; बाकी ; अवशेष [ ऊर द्वि . ] - वि . शिलकी ; उरलेलें ; राहिलेलें . ०दबणें बसणें - गांगरुन जाणें ; भयचकित होणें . ऊर उलणें पहा . ०दाटणें भरणें - ( दु : ख , प्रीति यामुळें ) गहिंवरुन येणें ; छाती भरुन येणें ; बांध बसणें . ०पिकणें कफ दाटणें व त्यामुळें घसा बंद होणें ; अतिश्रमानें छातीस ताण बसणें . ( ल . ) त्रास , छळ होणें . ०पिकविणें त्रास देणें . पदोपदीं येउनि शीकवीला । तथापि तेणें उर पीकवीला ॥ - सारुह २ . १४ . ०फाटणें अतिशय दु : ख होणें ; ऊर उलणें - दबणें पहा . फाटे उर शोकानें बहु निंद्य क्षत्रधर्म त्या वाटे ॥ - मोअश्व ५ . ३९ . ०फुटणें ( स्त्रियांना उद्देशून ). स्तनांचा उद्गम होण्याच्या वयास येणें ती ऊर फुटण्याच्या वयांत आली आहे . ह्रदयविकार होणें ; छाती फुटून निकामी होणें ( घोडा ). शोकानें , काळजीनें व्याकुळ होणें ; उरीं फुटणें . ( व . ) हिंमत चालणें . पुरांत उडी टाकून धारेपर्यंत पोहत आला पण पुढें ऊर फुटेना . ०फोडणें अतिशय श्रम करणें . आहाराबाहेर काम करुन गळाठणें ; मेट्यास येणें . ०बडविणें दु : ख - शोकप्रदर्शनार्थ छातीवर हात मारणें . उरस्फोड करणें ऊर फोडणें ; अतिशय श्रम करणें . उरापोटीं करणें , धरणें , उरापोटावर उचलणें अतिशय श्रम करुन काम करणें , चालविणें , उचलणें ; ऊर फोडणें . अहो ! उरापोटीं करीन कसें तरी झालं ! - एकचप्याला . ती आपल्या मुलांना उरींपोटीं धरते . उरावर घालणें ( शिवी ) इच्छा नसतांना एखाद्यास देणें , द्यावयास भाग पडणें ; गोणीभर होन ब्राह्मणांच्या उरावर घातले . - नामदेवनाटक १०५ . उरावर असणें एखाद्यावर अधिकार चालवणें - सत्ता असणें ; एखाद्याच्या डोक्यावर असणें . उरावर घेणें अतिशय कठिण काम पार पाडण्यासाठीं अंगावर घेणें , स्वीकारणें . ( ल . ) ( शिवी - स्त्रियांच्या बाबतींत ) संभोग देणें . उरावर धोंडा ठेवणें - स्वत : चे मनोविकार दाबून धरणें ; स्वत : वर जोर चालविणें . एखाद्यास अतिशय कठिण काम करावयास सांगणें ( पूर्वी मोंगलाईत सरकारी वसूल करण्यासाठीं शेतकर्याच्या उरावर धोंडा ठेवीत असत यावरुन ). सक्ति करणें ; कोणी तुमच्या उरावर धोंड ठेवली होती ? - नाकु ३ . १५ . उरावर बसणें - छातीवर बसणें . ( ल . ) टाळतां न येणारें काम अंगावर येऊन पडणें ; त्यामुळें असहाय्यता येणें . मागें लागून निकडीनें काम करुन घेणें . पुरुषानें एखाद्या स्त्रीवर बलात्कार करणें ; स्त्रीसंभोग करणें . उरावर हात ठेवणें , लावणें , ठेवून , लावून , सांगणें , बोलणें - जोरानें वचन देणें ; एखाद्याबद्दल खात्रीनें सांगणें . या श्लोकाचा अर्थ मला समजला आहे , असें मी उराला हात लावून तुला सांगतों उराशीं धरणें - आलिंगन देणें . नम्रपणानें प्रार्थणें . कांहीं झालें तरी ( हातीं घेतलेलें काम ) शेवटास नेण्याचा निश्चय करणें ; सतत ( गोष्ट ) स्मरणांत ठेवणें . स्वीकारणें ; पतकरणें ; आपलें म्हणणें ; न सोडणें . उरावर शेगडी - अतिशय दु : ख ; विवंचना ; त्रास . उराला हात लावणें - सत्यता , आत्मविश्वास , निश्चय , धमक दाखविण्यासाठीं छातीस हात लावणें . उरास लावणें , उरीं पोटीं धरणें - दादाबाबा करणें ; मन वळविणें . उराशीं धरणें पहा . उराची शिंप , शिंपी - स्त्री . ( निंदाव्यंजक ) खोल छाती ; छातीचा खळगा . उराचा तख्ता - पु . भरदार छाती . उराचा पांजरा , पिंजरा - पु . क्षीणतेमुळें छाती वरील सर्व हाडें दिसणें ; छातीचा सांपळा . उरावरचा गोहो , धगड - पु . ज्या व्यक्ती - अगर वस्तूविषयीं एखाद्यास सतत भीति वाटते ती वस्तु ; उरावरील दडपण ; धोंड . नवरा ; जार . [ कों . गोहो = नवरा ] उरीं डोंगर घेणें - कठीण काम स्वीकारणें ; अतिशय दगदग करणें . उरीं डोंगर पुरीं काट्या घेणें - ( छातीवर पर्वत घेणें व नदीच्या पुरांतून काटेकुटे ओढून काढणें ) पोटासाठीं अतिशय दगदगीचे काबाडकष्ट करुन सर्व तर्हेचे उपाय करुन पाहाणें . उरीं पोटीं करणें - अतिशय श्रम करणें उरापोटीं करणें पहा . उरीं फुटणें - ऊर फुटणें पहा . इतका अभ्यास करुन उरीं फुटायचं आहे का काय ? - मी ( आपटे ). उरीं भरणें - दमणें . उरीं भरली ऊरपोट । केली चळवळ झाली घाबरी ॥ - पला २ . तो सक्तमजुरी करुन उरीं भरला . स्त्रियांच्या स्तनांचा उद्गम होणें ; ऊर भरणें . ०तूट स्त्री. ( उराशीं धरण्यांत , मिठी मारण्यात अडथळा , प्रतिबंध , व्यत्यय यावरुन ) वियोग ; विरह . ( क्रि० करणें ; होणें ). ०दुखी स्त्री. उरांतील दु : ख . ( ल . ) मत्सर ; हेवा . ०पाकीट न. ( क . शिवण ) छातीवरचा खिसा . [ ऊर + इं . पॉकेट = खिसा ] ०फोड स्त्री. उरस्फोड ; अतिशय दगदगीचें व संकटमय काम ; श्रम ; उद्योग . - वि . असे श्रम पडणारें , फार मेहनतीचें ( काम ) ०भेट स्त्री. छातीस छाती लावणें ; मिठी मारुन भेटणें .
|