Dictionaries | References

उतरणें

   
Script: Devanagari

उतरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   some person, animal, or thing.
   . 12 To run in the bore or slit--a pearl, a trinket.

उतरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

उतरणें

 स.क्रि.  जमिनीवर ठेवणें ; वरचा पदार्थ खालीं आणणें , ठेवणें .
 अ.क्रि.  पान्हवणें ; पान्हा सोडणें . ( गाईम्हशीनें ). ' आमच्या म्हशीला पाजतांना कोंडा पुढें ठेवावा लागतो त्याशिवाय ती उतरत नाहीं .' - खेस्वस . १७१ . ( सं उत् + तृ )
 अ.क्रि.  
   मुक्कामावर ओझें वगैरे ठेवणें ; खालीं , रिकामें करणें ; माल काढून ठेवणें ( गाडींतून , गलबतांतून ).
   ( जिना , घाट , पर्वत वगैरेवरुन ) खालीं येणें . उतरलें उदक पर्वत वळघे । - ज्ञा १० . ६९ . पुण्याचा रस्ता वाई नजीक सोनजाईच्या डोंगरावरुन खालीं उतरत होता . - विवि १० . १० . २१७ .
   हिशेब , माप , भविष्य इत्यादि बरोबर जमणें , पटणें ; ताळा पडणें ; मूळाबरहुकूम नक्कल तयार होणें . आतां ग्रंथकारांच्या म्हणण्याप्रमाणें भाषांतर उतरलें आहे . - विवि ८ . ८ . ८४ .
   खालीं आणणें ; खालीं येण्यास मदत करणें .
   मुक्काम करणें ; थांबणें ; वाहनांतून खालीं येणें . बिहारीलाल गाडींतून उतरले . आपलें सर्व खटलें बाहेरच्या देवळांत उतरा आणि तुम्ही सडे किल्ल्यांत या .
   उंची कमी करणें ; ठेंगणें करणें .
   धैर्य , राग , भीति , ज्वर , दर , भाव इत्यादि कमी होणें .
   पलीकडे नेणें ; पार करणें ( नदींतून वगैरे ).
   उतरुन घेणें ; पाहून काढणें ; नक्कल करणें ; चित्र काढणें ; छबी काढणें ; प्रतिमा काढणें ; चिंतूनें गणूच्या पाटीवरील उदाहरण उतरलें . नमुन्याबरहुकूम करणें ; कृति , हावभाव वगैरेंची नक्कल करणें . कोंकण्याची नक्कल हा हुबेहूब उतरतो .
   कोमेजणें , निर्जीव होणें ; निकृष्टावस्थेप्रत जाणें ; म्लान होणें ; सुकणें ( चेहेरा ). करितां अधर्म सद्य : स्वपितृसुह्रज्जन मुखप्रभा उतरे । - मोआदि ९ . ५७ . उतरलें पाहोनि सत्शिष्यवग्त्र । - दावि २६० . गंधर्वाकडून दुर्योधनास धर्मराजापुढें उभें केलें तेव्हां त्याचें तोंड उतरलें होतें .
   धारा , भाव , मागणी वगैरे कमी करणें ; अल्प प्रमाण करणें ; नवा राजा झाला त्याणें शेतास पीक नाहीं असें पाहून धारे उतरले
   वयातीत होणें ; प्रकृति खालावणें ; वस्त्र जीर्ण होणें ; शरीर , फुलें , मासे , मांस , मोत्यें वगैरेंचा तजेला नाहींसा होणें .
   अपकर्ष करणें ; दर्जा , हुद्दा योग्यता कमी करणें ; गर्व नाहींसा करणें ( ताशेरा , इ० द्वारां ).
   फळ वगैरे अविकणें , अधिक पिकणें .
   तीव्रता कमी करणें , शांत करणें ( विष , मादक पदार्थ वगैरेंची ).
   अढी वगैरे बरोबर पिकून तयार होणें .
   नारळ , मीठ , मोहर्‍या वगैरे पदार्थ अंगावरुन ओवाळून टाकणें . ज्यासी ह्रदयीं ध्याती पद्मजधूर्जटी । त्यावरोनि यशोदा उतरी दृष्टी । - ह १३ . १६१ . येसूबाईनें काल सदूवरुन एक कोंबडें उतरलें .
   योग्य रीतीनें बनणें , तयार होणें . एक काहीलभर रसाचा चार मण गूळ उतरला .
   नाक , कान , जीभ वगैरे अवयव कापून टाकणें ; या खडगें हें शिर उतरीं हा देह पडूं दे रणीं । - विक २९ .
   व्याधि , रोग वगैरेंतून पार पडण . देवींतून दोन मुलें उतरलीं , एक दगावलें .
   परीक्षेंत यश मिळविणें ; उत्तीर्ण होणें ; पास होणें . आमचा रामा यंदा परीक्षा चांगल्या रीतीनें उतरला .
   ( नदी , समुद्र इ० ) पार जाणें ; पलीकडे जाणें . बहु दुस्तर विपदंबुराशि उतराया । - मोकर्ण ७ . २३ .
   संकटांतून पार पडणें . तुम्हां जड भवार्णवीं उतरितां न दासा पडे । - केका १२१ .
   अंगावरुन काढणें ( कपडे , दागिने . वगैरे )
   विशिष्ट दिशेकडे वळणें . महामारी तिकडे खानदेशांत उतरली .
   ( उतरतें छपर , पडवी , सोपा वगैरे ) तयार करणें ; बांधून सिध्द करणें .
   मर्जीतून जाणें ; नाखुषी होणें .
   काढून टाकणें ( घराचा वरील भाग . इ० ). म्युनिसिपॅलिटीनें रामरावांचें घर पार उतरलें .
   मनास पटणें ; योग्य वाटणें ; पसंत होणें . हें नाटक लोकांच्या पसंतीस उतरलें . - विवि ९ . ८ . १७५ .
   कापून टाकणें , साफ करणें ( दाढी , मिशा वगैरे )
   ( पत्त्यांच्या खेळांत ) पान टाकणें . तुम्ही एक्का उतरा .
   मोतीं वगैरेंचे छिद्र मोठें होणें ; वेजी उतरणें .
   गरोदर स्त्री प्रसूतीपासून मोकळी होणें , हातींपायीं सुटणें .
   झाडांवरुन फळें वगैरे काढणें . आम्हीं आमच्या आंब्यावरील आंबे आज उतरले .
   नाहींसें होणें , फिटणें . तैं सुतकें सूतक उतरे दोहींचेही । - एभा २१ . १२५ .
   वरुन खालीं येणें ( घाट , जिना वगैरे ) [ सं . उत + तृ ]
   ( लहान मुलींच्या खेळाच्या प्रारंभीं ) चकून पार पडणें .
   लागणें ; उत्पन्न होणें . जयाचिया दृष्टी उतरे । - विपू २ . १६ . [ सं . उत्तरण ] उतरुन टाकणें -
   तबल्यावरील वाद्या , साज वगैरे काढून टाकणें .
   ओंवाळून टाकणें ( आजारी माणसावरुन खाद्य पदार्थ , प्राणी वगैरे ).
   ( सामा ) खालीं काढणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP