पु. मल्ल . माल मर्दूनि मालखडा । - एभा ३१ . ३४१ . [ सं . मल्ल ]
पु. परिणाम ; शेवट . [ अर . मआल ]
मालअन्देशी स्त्री . परिणामाचा अगोदर विचार करणें . मालअन्देसी . - पेअ ६० . [ अर . मआल = परिणाम ]
०खडा पु. अजिंक्य मल्ल . चाणूर मुष्टिका दीधला विडा । युद्ध करावया मालखडा । - कथा ४ . ६ . ३८ .
मालखंड पु . ( महानु . ) युद्धभूमि ; कुस्तीची जागा . गिरी गजरगडा मालखडा प्रवेशे । - गस्तो . मालखंडां जें केलें क्षात्र । - एभा ३१ . ३८१ .
मालगंठी स्त्री . ( महानु . ) मल्ल बांधतात त्याप्रमाणें कास बांधण्याचा प्रकार ; विशिष्ट प्रकारें गांठ देऊन वस्त्र नेसण्याची पद्धत . तो पीतांबरु असे वेढिला । मालगंठी । - दाव २२४ . [ सं . मल्ल + ग्रंथि ]
मत्ता ; वित्त ; द्रव्य ; संपत्ति . जिन्नस ; सौदा ; विक्रीचा पदार्थ ; जिन्नसपान्नस .
०जेठी पु. मल्ल .
मालातिणें , मालाथणें , मालाथिणें सक्रि . ( महानु . ) मल्लविद्येनें वेढणें ; मोहित करणें . येणें अहंकारें मालाथिल । - ज्ञाप्र ६ . ३२ .
किंमतीची वस्तु . हा आठा रुपयांचा माल आहे .
निस्तेज होणें , करणें .
( कायदा ) प्रत्येक जातीची जंगम जिंदगी .
जमाबंदी . मालाचें ( रेव्हेन्यूचें ) काम . - निजामविजय १४ . १२ . ३१ . [ अर . माल ] ( वाप्र . )
निःशेष होणें . भीतरीं मालाथिलें । साभिळासे । - कालिका २६ . ४० .
आश्रय , आंगीकार करणें . तैसा प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जवं एकाधें शरीर । माल्हातीना । - ज्ञा १६ . २७७ . [ प्रा . ]
०खाणें ( व . ) मेवा , मिठाई इ० गोड पदार्थ खाणें .
माल केमाल , मालचा माल वाढ , सुधारणा होणार्या किंवा घट , अपकार होणार्या कामीं लावल्यावरहि ज्याच्यामध्यें बरावाईट असा काहींच बदल होत नाहीं असा पदार्थ ( पैसा , माल इ० ).
०वथरणें ( व . ) पीक चांगलें येणें ;
मालावरचा नाग वि . पैशाचा उपयोग न करतां त्याचें केवळ रक्षण करणारा ( कृपण मनुष्य ). श्रमाशिवाय आयती संपत्ति ज्यास मिळालेली आहे असा ( इसम ). सामाशब्द -
०अस्बाब पु. चीजवस्त वगैरे संपत्ति .
०कटनी, काटणी काटी स्त्री . शेताच्या कापणीसाठीं सरकारची परवानगी मिळण्याबद्दल दिलेली रक्कम ; फी .
पिकाची कापणी .
०काळी स्त्री. ( व . ना . ) शेतजमीनीचा सरकारसारा . वर्हाडची मालकाळी किती ?
०खरा वि. पूर्ण किमतीचा ( चेंचलेलें किंवा विरुप झालेंलें असलें तरी जें चांगल्या धातूचें असतें असें नाणें इ० ). [ माल + खरा ]
०खाना पु. कोठी .
०चाटी चाट्या - पु . शाळेंतील उपगुरु . [ माल + चाट्या ]
०जामिनकी स्त्री. मालजामिनाचा अधिकार , काम .
०जामीन पु. मालाचा , पैशाचा जामीन ; अमूक रक्कम अमुकवेळीं देईन अशी हमी घेणारा . - रा १६ . ५० . याच्या उलट हाजीर जामीन .
०टाल पु. चोज वस्त ; माल आणि इतर सामान . [ माल द्वि ]
०दार वि. ( व . ) श्रीमंत . गावांत मालदार लोक आहेत .
०धनी पु मालाचा जिन्नसाचा धनी .
०पिसा वि. मालाचा नाश झाल्यानें किंवा तो नष्ट होण्याच्या भीतीनें वेड लागलेला .
०पिसें न. मालाच्या नाशामुळें किंवा नाशाच्या भयामुळें लागलेलें वेड .
०बंदी वि. ऐवजदार ; किंमतवान ; मोलवान .
घणसर द्रव्याचा . भक्कम ( बांधणी , मांडणूक ).
०बिसात स्त्री. मालमत्ता .
०मत्ता स्त्री. ( व्यापक . ) सर्व धनदौलत , जिंदगी , इष्टेट ; रोकड , माल , चीजवस्त इ० सामान . [ अर . माल + मताअ ]
०मवेश, शी स्त्री . चीजवस्त ; गुरेंढोरें ; मालमत्ता . [ अर . मवेशी ]
०मसाला पु. ( व्यापक , )
- मिश्रणाचीं द्रव्यें .
- इमारती इ० कामासाठीं लागणारें दगड , विटा , चुना , लाकूडफाटा इ० सामान . उपयुक्त वस्तु , सामग्री . [ माल + मसाला ]
०मस्त वि. संपत्तीनें चढलेला ; धनगर्वित ; धनोन्मत्त . [ अर . माल + फा . मस्त = मत्त ]
०मालिक पु. धनी . तरी मालमालिक व्हा त्याचे । - दावि ८ .
०मालीयत स्त्री. मालमत्ता . संस्थानामध्यें मालमालीयत व स्वभाव ... - वाडबाबा १ . १३४ .
०मिळकत मिळकत - स्त्री . माल व चीजवस्त ; जंगम व स्थावर मालमत्ता . [ अर . ]
०मुद्दल न. झालेल्या खर्चाच्या किंवा आगाऊ दिलेल्या पैशाच्या बरोबरीचा जिन्नस . उदा० माझें मालमुद्दल उभें राहिलें - आलें - हातास लागलें . - क्रिवि .
बरोबर किंमतीला ( क्रि० विकणें ; विकत घेणें ; करणें इ० ).
मूळ किंमतीला .
०मोल वि. योग्य किंमत दिलेला ; त्याच्या किंमतीला घेतलेला , विकलेला , मांडलेला . - क्रिवि . योग्य किमत देऊन . ( क्रि० विकत घेणें ; विकणें ; मांडणें ; गहाण ठेवणें इ० ).
०मोल - स्त्री . योग्य किंमत .
किंमत - स्त्री . योग्य किंमत .
०वाडी पु. ( कों . ) कुलवाडी ; कूळ ; शेतकरी . गावांतल्या समद्या कुलवाडी मालवाड्याशीं काय हाय ? जो तो कसा तरी उपाश्यानें दीस लोटतोय . - चैत्रावळ - महाराष्ट्र शारदा , जून १९३५ .
०शिकार्या वि. ( व . ) उत्तम पदार्थावर हात मारावयास संवकलेला .
०साईर न. मालावरील जकात . कसवो कसवो कराहरा मालसाईर सुधी तुमपर राखो . - वाडबाबा १ . २१ .
०हराऊ वि. तोटा , नुकसान , खराबी करणारा . ( प्राणी , वस्तु , काम याची ).
मालक , मालीक वि .
मालक , मालीक वि . धनी ; स्वामी .
अधिपति ; शास्ता ; अधिकारी .
हक्कदार ; जो एखादें काम पाहतो किंवा ज्याचें तें काम आहे असा मनुष्य .
माझा बाप जामीन राहिला आहे तो त्या गोष्टीचा मालक . त्यास काय तें विचारा .
( बायकी ) पति ; नवरा .
( कायदा ) एखाद्या कंपनीचा , मंडळाचा गुमास्ता ; मॅनेजिंग एजंट .
( पुश्तु ) टोळीचा नायक .
शेतकरी .
जमीनदार . [ अर . मालिक ; मालक ]
मालकी स्त्री . धनीपणा ; स्वामित्व . सत्ता . [ मालक ]
मालकीयत - स्त्री . स्वामित्व . मालकीयत व खाविन्दी . - दिमरा १ . २०७ . [ हिं . ]
माल गुजार , माल गुझार - पु .
जमीन खंडानें देणारा , जमीनदार .
सरकारचा वसूल जमा करुन देणारा .
( व . ) पाटील . [ फा . माल्गुझार ]
०गुजारी गुझारी - स्त्री .
सरकारसारा देणं .
मालगुजार्याचा हक्क .
मालम , मालिम - पु . गलबताचा हिशेब व व्यवस्था पाहणारा अधिकारी ; नाखवा .
मालत , मालयत , मालियत , मालीयत मालिस्त - स्त्री . जिंदगी ; उत्पन्न ; वसूल ; मालमत्ता . त्यांची मालयत फारच गेली . - ख ११ . ५९५५ . माणसास न मारावें , मालत घेऊन सोडून द्यावें . - भाकै २६ . [ अर . मालीयत ]
माली - वि . वसुलासंबंधीं . माली व मुल्की . - वाडसमा ३ . २४ . [ फा . माली ]
माली मामला - पु .
( जकात ) किंमतवान माल ; जो विकला असतां पैसा उत्पन्न होईल . असा माल ; सर्व खर्च सोसण्याजोगा माल .
जकातीचें काम .
मालीव - वि . ( कों . ) कांहीं किंमतीचा ; विकला असतां कांहीं किंमत येणारा ( मौल्यवान जिन्नस ). [ माल ]
मालोमाल - वि . किंमतीच्या योग्यतेचा ; दिलेल्या पैशाइतक्या किंमतीचा . ( विकत घेतलेला जिन्नस ). ( क्रि० विकणें इ० ). [ माल द्वि . ]