Dictionaries | References त ताळा Script: Devanagari Meaning Related Words ताळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . ताळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Agreement, correspondence.ताळा पाहणें-घेणें Compare together.ताळ्यावर येणें Consent to and come under (some rules), to come-round. ताळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकवाक्यता , जुळणी , प्रचीती , प्रत्यय , मेळ , सांगड . ताळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया Ex. संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा. SYNONYM:पडताळा ताळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( हिशेब , भिन्नभिन्न हकीगती , गोष्टी , उपन्यास , साधने इ० कांतील ) मेळ ; जुळणी ; एकवाक्यता ; अविरोध ; जुळतेपणा ; सुसंगतपणा . ( क्रि० घेणे ; पडणे ; पाहणे ; मिळणे ). कदापि नाही वचनास ताळा । - सारुह ३ . १३ . त्यांच्या कामांचे ताळे कसे घ्यावयाचे ह्या संबंधाने मोहनरावांनी माहिती करुन घेतली . - कोरकि ४५ . २ ( केलेल्या भाकिताशी नंतर घडून आलेल्या गोष्टीचा , आलेल्या अनुभवाचा ) मेळ ; जुळतेपणा ; प्रत्यय ; पडताळा ; दृकप्रत्यय ; प्रचीति ; प्रतीति . ( क्रि० येणे ; मिळणे ). म्हणोनि येळील न करावे । पाहाणे ते येथेचि पाहावे . । ताळा पडता राहावे । समाधान । - दा १९ . ५ . १७ . आपल्या उपपत्तीस ताळा मिळतो की नाही याचा फार विचार न करतां ... - नि ८१६ . २ एखाद्या गोष्टीचा खरेपणा इ० दुसर्या प्रमाणाने ताडून , अजमावून पाहण्याची वेगळी रीत . ४ सत्यत्वबुद्धि . - मनको . [ सं . ताल ] पु. ( माळवी . ) टाळा ; कुलूप . [ सं . ताल ; हिं . ताला ]०घालणे मेळ बसविणे ; एकवाक्यता करणे . तुका म्हणे ताळा घातला आडाखी । ठावे होते सेकी आडविसी । - तुगा १२३८ . ( एखाद्या गोष्टीचा दुसर्या गोष्टींशी - ह्याचा त्याचा ) ताळा पाहणे घेणे दोन गोष्टींची , वस्तूंची परस्परांशी तुलना करणे , परस्परांशी ताडून पाहणे . ताळ्यास ताळ्यावर येणे नीट मार्गाला लागणे ; स्वैरपणा सोडून देऊन सुमार्गाने चालणे ; शुद्धीवर येणे .०तोळा पु. ताळमेळ ; व्यापक अर्थाने ताळा शब्दाबद्दल वापरतात . ताळा पहा . [ ताळा द्वि . ]०वाळा पु. ताळमेळ . - शर . [ ताळा द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP