|
स्त्रीन . न. प्रत्यक्ष न होतां परंपरेनें झालेला , अप्रत्यक्ष संबंध , स्पर्श , विटाळ . या सुतक्याचें मला एकंदर झालें म्हणुन मी स्नान करतों . [ सं . एक + अंतर , हिं . अंदर ] एकत्र करणें ; एकवट करणें ; एके ठिकाणीं आणणें ; बेरीज ; मिळवणी . स्नेह ; सोबत ; संगत ; मैत्री . - वि . क्रिवि . एकत्र ; जुटींत ; सहवासांत ; मिश्रणांत . तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन । - ज्ञा ५ . १५१ . तादूळ आणि डाळ एकंदर केली म्हणजे खिचडी होते . एक रकमी सर्व ; एकत्र करुन ; एकदम . जसें - एकंदर जमा - आकार - ताळा - पत्रक - पट्टी ; एकंदरीचा हिशोब - बेरीज - वही . सर्वांनीं मिळून ; एका संघानें ; एका ताफ्यांत ; एकवट . सारीं औषधें एकंदर कुटून मग बांधा . ठोक ; एकूण ; एक गठ्ठी ; एक गोळा . पुन्हां पुन्हां करण्याचें कारण न ठेवितां ; एकवार , एकदांच ( ताकीद , इशारा वगैरे ). याप्रमाणें वर्तावें म्हणून त्यास एकंदर ताकीद केली आहे . ( नकारात्मक ) कधींहि नाहीं ; बिलकूल ; केव्हांहि अशक्य या अर्थानें . तूं माझ्या घरीं एकंदर येऊं नको . = कधींहि , केव्हांहि येऊं नको . - पया ४८५ . - ख ११७६ . [ सं . एकत्र ] ०गट क्रिवि . सर्व मिळून एकत्र ; एकरकमी ; एकजिनसी सर्व ; एक जुटीनें , मेळ्यानें , समूहानें . ०ची - स्त्री . बेरजांची सरासरी ( एखाद्या मोठ्या हिशोबाच्या ). सरासरी - स्त्री . बेरजांची सरासरी ( एखाद्या मोठ्या हिशोबाच्या ). ०भाव पु. सरासरी दर ; किंमत . ०विक्री स्त्री. घाऊक , ठोक , एकदम , एकजिनसी विक्री .
|