|
वि. स्त्री. तुतारी ; पिपाणी ; कर्णा . भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ । - ज्ञा १ . १३२ . [ ध्व . ] सैल ; ढिलें ; न आवळलेलें ( गाठोडें , गठ्ठा , पोशाख इ० ). सैल कपडे घालणारा ; अजागळ ( मनुष्य ). अर्धवट ; मूर्ख ( मनुष्य ). अव्यवस्थित ; ढिलाईचा ( धंदा , काम ). पोकळ ; कमजोर ; भरींव नसलेला ( वासा , खांब , दाणा इ० ). हलकी ; पोकळ ( कवडी ). ज्याचें भोंक मोठें झालें आहे असा ( मोती ). ( व . ) नागवा ; नागडा ; वस्त्रहीन ; उघडा . [ भोंक . ] ०कवडी स्त्री. ( ल . ) अजागळ , वेडसर मनुष्य . ०जमाखर्च रकम - पुस्त्री केवळ दाखविण्यापुरता सरासरी अव्यवस्थितपणें ठेविलेला जमाखर्च किंवा दर्शनी रक्कम ; निश्चित नव्हे अशी रक्कम . ०तारीख स्त्री. कोणत्याहि तारखेचा न जमलेला जमाखर्च . ०पणा पु. सैलपणा ; ढिलाई ; अव्यवस्थितपणा . ... आणि फुकट भत्ता देणें यांत सरकारचा भोंगळपणा आहे . - इनाम १३४ . ०भट पु. अजागळ , नेभळट ब्राह्मण ; पोकळभट . ०वही स्त्री. अव्यवस्थित जमाखर्चाची वही . ०सुती सूत्री - वि . सैल ; नेभळट ; अव्यवस्थित ; ढिलाईचा ; अजागळ ( काम , धंदा , भाषण , वागणूक , वक्ता , मजूर इ० ). भोंगळणें - सक्रि . ( कों . ) ढिला , सैल , अव्यवस्थित होणें ( गठ्ठा , गाठोडें , पोशाख इ० ). भोंगळी - स्त्री . ( अशिष्ट ) गचाळ , नेभळट , अव्यवस्थित , हिडीस स्त्री . भोंगळी - स्त्री . नळींतील पोकळी . ( यावरुन ) नळी ; नळकाडें ; सुरळी ; वळी . नंतर कागदाचे भोंगळींत भरुन ... कडबोळीं करतात . - अग्नि ३ . ( कों . ) पाणी वहावयासाठीं माड इ० झाडाचा पोखरलेला नळ . पोकळी . कवलारु घरांवरील कौलें पडूं नयेत म्हणून वळचणीस ठोकलेली पट्टी ; गजभोंगळी पहा . ( अशिष्ट ) ढुंगण ; कुल्ले . ०कुलूप भोंगळीचें कुलूप - न . नळीच्या आकाराचें देशी कुलूप .
|