Dictionaries | References

लगत

   
Script: Devanagari

लगत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 affinity or relationship. 3 intimacy, familiar association or acquaintance with.
   close to, nigh, near. Ex. त्या गांवचे ल0 नदी आहे; दसरा नवरात्राचे ल0 आहे म्हणून कोण्ही नवरात्रांतच धरतात.
   . Ex. ल0 तीन चिठ्या पाठविल्या तेव्हां तो निघून आला; एथून ल0 तीन शेतें आमचीं आहेत. note. With लगत, varied euphonously with लगता, as bearing the common sense involved under continuous, conterminous, contiguous, consubsisting, cohering &c., numerous serviceable compounds, after the manner of the compounds here following, may be formed by the translator or scholar.

लगत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  connection. affinity. intimacy.
 prop  close to. connectedly.

लगत

   जवळ ; समीप ; सन्निध . दसरा नवरात्रीचे लगत आहे म्हणून कोण्ही नवरात्रांतच धरतात .
   लागोपाठ ; लगोलग . लगत तीन चिठ्ठ्या पाठविल्या तेव्हां तो निघून आला .
   अनुक्रमाने ; खंड न पडतां ( कालाचा , स्थलाचा ). एथून लगत तीन शेते आमची आहेत . [ लाग ] सामाशब्द -
०मजकूर  पु. परिच्छेद , भागपाडलेला ( लेखी किंवा तोंडी ) मजकूर ; लागोपाठ मजकूर . तुटक मजकुराच्या उलट .
०लखोटा  पु. 
   हुंडीपत्राचा इ० मजकूर आंत लिहून त्याच हुंडीपत्रास चिकटवून पाठविलेला कागदाचा लाखोटा ; हुंडीला चिकटविलेली आणि हुंडीबरोबर घडी घातलेली सूचना आंत असणारा लखोटा .
   आंतील मजकूरवरील पत्ता निरनिराळ्या बंदावर नसून एकाच बंदावर असतात ते पत्र ; पत्रलाखोटा एकच असा प्रकार .
०हुंडी  स्त्री. सूचनेचे पत्र सोबत असलेली हुंडी . लगता पु .
   संबंध ; जोड ; जवळजवळ असणे ( देशाचे , पदार्थाचे ).
   शेजारी , भिडून असणारा प्रदेश ; सरहद्दप्रदेश ; सीमाप्रांत . यंदा करनाटकचे लगत्यास चांगले पीक आले . - वि . लागून , जोडून असलेला .
०जाब  पु. 
   लगतलखोटा ; हुंडीबरोबर घडी करुन हुंडीला चिकटविलेले हुंडीच्या सूचनेचे पत्र .
   हुंडीच्याच लिफाफ्यांत लिहिलेली हुंडीसंबंधी सूचना , जाब .
०लाखोटा  पु. लगत लाखोटा पहा .
०लोळ  पु. 
   मागे लोंबणारा वस्त्राचा घोळ ; मागे फरपटणारे वस्त्र .
   मालिका ; माळ ; लांबण . ( क्रि० लावणे ; लागणे ).
   शेते , मळे , झाडे इ० कांची लांब मालिका ; आश्रितांची , पदार्थांची , साधने - उपकरणी यांची लांबलचक मालिका , गाडी . लगतलाळ - स्त्रीपु . माला ; माळका ; हार ; एकसारखा क्रम . ( क्रि० लावणे ; लागणे ). लगताळा - ळ्या - वि .
   चिकट ; पाठ पुरविणारा ; तेलंगभट .
   अंगावरील वस्त्राचा घोळ मागे टाकणारा ; कपडे फरपटवीत जाणारा . ( ल . ) गबाळ ; भोंगळ . लगती - वि .
   विवाहाने संबंध असलेला ; सोयरीक असणारा ; सोयरा ; नातेवाईक . तुम्ही पडला श्रीमंताचे लगती , तेव्हां तुम्हास असे कसे बोलावे ?
   स्नेहाचा ; प्रीतीचा . [ लगत ]

लगत

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
लगत   prob.w.r. for next.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP