Dictionaries | References

मरत

   { maratḥ }
Script: Devanagari

मरत     

वि.  मेलेलें ; मृत . [ सं . मृत ]
०मडें   - न . अतिशय अशक्त मनुष्य ; मरतुकडा . मढ्यासारखा - वि . कृश ; अशक्त .
ढें   - न . अतिशय अशक्त मनुष्य ; मरतुकडा . मढ्यासारखा - वि . कृश ; अशक्त .
०वड   वडा - स्त्रीपु . मरणाची सांथ . ( क्रि० येणें . )
०वांझ    - स्त्री .
जिचीं मुलें लहानपणींच मरतात अशी स्त्री वांजपण संदिसें गेलें । तों मरतवांज नांव पडिलें । - दा ३ . ३ . ३९ .
( कर्‍हाडी ) मरतांना एकहि मूल जिवंत नसलेली स्त्री .
०संभाळ  पु. 
मरावयास टेकलेलें माणूस , पशु इ० ची शुश्रूषा .
प्रेमपूर्वक केलेलें संगोपन ; आस्था ; काळजी . ( क्रि० घेणें ).
कोणत्याहि गोष्टीचा केलेला अतिरेक ( जेवण , झोंपणें , बसणें , लिहिणें इ० चा ); शेवटपर्यंत पिच्छा पुरविणें . ( क्रि० घेणें ). मरतडणें - अक्रि . मरावयाच्या बेतांत असणें ; मरावयास टेकणें . मरता आहार - पु . मरणोन्मुख माणसाचें शेवटचें खाणें . मरताक - न . ( कुण . )
मृताची और्ध्वदेहिक क्रिया ; दिवस .
मरण ; मृत्यु .
मृत मनुष्य ; प्रेत ; मुडदा . [ सं . मृतक ] मरती कळा - स्त्री .
मरणाच्या वेळीं चेहर्‍यावर येतो तो फिकटपणा ; प्रेतकळा .
आजार्‍यासारखा दिसणारा माणूस . मरती भावना - स्त्री . मरण जवळ येऊन ठेपलें आहे असें जीवरुन समजतें अशी मुद्रा . मरती रात्र - स्त्री . ऐन रात्रीचा समय . ( स्वतःचें म्हणणें खरें आहे हें ज्यांना साक्षी ठेवून दाखवावयाचें त्यापैकीं एक प्रमाण ). मरती रात्र झाली आहे खोटें बोलत नाहीं . काळी रात्र , भरल्या बंदाखालीं बसणें पहा . मरतुकडा , मरतुंगडा , मरतंगडा - वि . अगदीं अशक्त ; रोडका ; मरतमढें . मरमर - स्त्री .
धोक्याच्या परिस्थितींत , प्राणावरच्या संकटांत अविचारानें शिरणें ; फाजील धाडसी ; साहसी वृत्ति ( वेडपा , कैदाशीण इ० ची ). ( क्रि० येणें ; लागणें ; घेणें ).
उपहास ; टवाळकी . म्ह० आपली हाण ( हानि ) आणि जगाची मरमर .
कुरकुर . पाठी बैसला दावेदार । जाली मरमर संसारीं ।
०घेणें   
अत्यंत क्षीण , मरणासन्न होणें .
मरणाची धास्ती घेणें ; हाय खाणें . मरमरा , मरवडा - पु .
मरमर अर्थ १ पहा .
( निंदार्थी ) पराकाष्ठेचा अशक्तपणा ; मरणप्राय स्थिति . तुला काय मरवडा आला ! मरवड - स्त्री . मरण , रोग इ० ची साथ ( माणूस , जनावर इ० ची ).

मरत     

मरतः [maratḥ]   Death.

मरत     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मरत  m.  (-तः) Death, dying.
E. मृ to die, अतच Unādi aff.
ROOTS:
मृ अतच

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP