|
अ.क्रि. अस्तास जाणें ( सूर्य , चंद्र , आकाशस्थ तारे ). ( ल . ) ओसरणें ; नाहींसा होणें ; मरणें ; अदृश्य होणें ( देवी , खरुज , पुटकुळ्या , फोड ). पाकळ्या मिटणें ( सायंकाळीं फुलाच्या ). ( ल . ) बुडणें ; नाहींसें होणें ; मालवणें . ( कीर्ति , वैभव , थोरवी , जीव ). [ सं . म्लै ] मावळत - क्रिवि . पश्चिमेकडे . तूं मावळत तोंड करुन बैस . मावळत , ती - स्त्री . मावळण्याची जागा ; पश्चिम दिशा . मावळती बाजू - स्त्री . ( माण . ) पश्चिम . मावळों सरणें - क्रि . मावळावयास आणें . मावळणें . कां मावळों सरला दिवो । - अमृ ७ . १८९ .
|