|
स्त्री. बुडण्याची जागा ( पाणी , काम , व्यापार इ० त ) ( शब्दश : व ल . उपयोग ). नुकसान ; तोटा ( व्यापार , उद्योगधंदा इ० त ). बुडणूक - स्त्री . बुडण्याची क्रिया ; बुडलेली स्थिति . ( शब्दश : व ल . ) बुडणें - अक्रि . पाणी इ० द्रव पदार्थांत खोल जाणें ; अंतर्धान पावणें . ( ल . ) ( काम , उद्योग , अभ्यास इ० त ) गढून जाणें ; गर्क होणें ; निमग्न होणें . देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली । - ज्ञा १५ . ४२६ . ( ल . ) ( दु : ख , काळजी , चिंता , कर्ज इ० नें ) व्याप्त होणें ; जर्जर होणें ; आकुल होणें . नता करुनि मुक्तही म्हणसि मी बुडालों रिणें । - केका ११ . ( ल . ) ( मनुष्य , पीक , गांव , देश , व्यवहार , पैसा इ० ) नष्ट होणें ; नाश पावणें ; नाहींसें होणें . तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये । - ज्ञा १५ . ४४० . निष्फळ होणें ; फुकट जाणें ; गमावणें ; निरुपयोगी होणें . समयास जर तुम्ही तेथें पोंहचलां नाहीं तर तिकडील दक्षिणा बुडेल आणि घरचे कामाचा दिवसही बुडेल . ( ल . ) ( ग्रंथ , नाणें , चाल , धर्म इ० ) बंद पडणें ; प्रचारांत नसणें ; अंमलांतून जाणें . ( दिवस ) संपणें ; शेवटास जाणें . ( सूर्य इ० ) मावळणें . [ सं . बुड = लेपणें ; प्रा . बुड्ड ] म्ह० चढेल तो पडेल पोहेल तो बुडेल . बुडतठाव - पु . मनुष्य इ० बुडून जाण्याइतकी पाण्याची खोली . ह्याच्या उलट छातीठाव , कमरठाव . बुडता - वि . बुडणारा ; उतरता ; र्हास पावणारा . जसें बुडता पाया - काळ - व्यापार - धंदा - दौलत इ० . आंत टाकलेला पदार्थ बुडेल इतकें ( पाणी , तूप , तेल ). [ बुडणें ] म्ह० बुडत्याचा पाय खोलांत - खोलाकडे = खालावलेल्या माणसाची प्रवृत्ति आणखी अपकर्षाकडे होत जाते . बुडता काळ - पु . नुकसानीचा काळ ; र्हासकाळ ; संकटकाल ; पडता काळ . बुडत्या काळीं हात देणारे थोडेच . - विवि ९ . ८ . ७१ . बुडता पाया - पु . उतरत्या कळेचा , र्हासाचा आरंभ . ( क्रि० लागणें ; होणें ). बुडचा , ला - वि . तळचा ; बुडाकडील . बुडालेल्या घरचा मोड - पु . कुटुंबांतील सर्व माणसें मरुन जाऊन शिल्लक राहिलेला एकच मनुष्य .
|