|
दोन या शब्दाबद्दल समासांत पूर्वपदी योजावयाचे रुप . जसेः - दुकलमी , दुकसबी , दुखंड , दुभाषी , दुतर्फा इ० ( दोन या अर्थी समासांत पूर्वपदी हा शब्द योजून अनेक सामासिक शब्द बनतात त्यापैकी बरेचसे पुढे दिले आहेत . ) [ सं . द्वि ; प्रा . दु , दो . हेम १ . ९४ . ] दुअमल - पु . एकाच गावावर असलेला दोन निरनिराळ्या सरकारांचा अंमल . असला प्रकार मराठे व मुसलमान यांच्या राजवटीत होई . दुअमली गाव - पु . ( मराठे व मोंगल , मराठे व निजाम , मराठे व हैदर अशा ) दोन सरकारांच्या अंमलाखालील गांव . दुआब - पु . दोन नद्यांच्या चिमट्यामधील संगमाच्या अलीकडचा प्रदेश . गंगा व यमुना यांच्या मधील दुआबास अंतवदी असे म्हणतात . [ सं . दु + अप ; फा . दो - आब ] दुकटा - वि . दुसरा ; बरोबर कोणी सोबतीला आहे असा ( हा शब्द एकटा या शब्दाप्रमाणेच बनला असून एकटा या शब्दाबरोबर त्याचा उपयोग करितात ). ही वाट एकट्या - दुकट्याने जावयाजोगी नाही . तूं एकटाच जा , दुकटा कोण देऊ ? दुकटे - न . ( राजा . ) गवताला जे दोन फाट्यांचे केसर येते ते . दुकटे - न . ( चि . ) जुने लुगडे इ० कास अवश्य तितक्या लांबीच्या घड्या घालून व दोर्याने शिवून तयार केलेले पांघरुण ; दुपटे ; दुट्टा . दुकड - वि . ( व . ) अर्धवट ; अर्धा . पोळी दुकड काची राहिली . दुकंडा - पु . दोन गंड्यांचे , दोन कवड्यांचे चलन ; दोन गंडे ; टोली . दर चौकास दर बैलास कवडी दुकंडा प्रमाणे राजश्री यशवंतराव पवार याचे अमलांत घेऊन रखवाली करीत होतो . - वाडबाबा १ . २५ . [ दु + गंडा ] दुकडी - वि . ( धरण्याकरिता ) दोन कड्या असलेले ( भांडे ). [ दु + कडी ] दुकल - स्त्री . ( गंजिफांचा खेळ ) दुक्कल पहा . दुकलमी - वि . १ दोन रकान्यांत दोन पक्षांनी , व्यक्तींनी लिहिलेले ; दोन लेखण्यांनी लिहिलेले ( पत्रक ). २ दोन कलमांचे , परिच्छेदांचे ( पत्र , ठराव इ० ). दुकसबी - वि . दोन धंद्यांचे , कसबांचे , कामांचे ज्ञान , कौशल्य असलेला . २ ( ल . ) हुशार ; कर्तबगार . दुकॉ - पु . ( गो . ) दुव्वा ; दुक्का पहा . दुकांटी - वि . दोन काट्यांचे ( कुलूप , टाळे ). दुकांठी - वि . दोन हात लांबीचे बारीक ( जाळण्याच्या उपयोगाचे ) लांकूड . [ दु + कांडे ] दुकानी - वि . दोन काने असलेली ; दारु पेटवण्याची दोन भोके असलेली ( बंदूक ). [ दु + काना ] दुकानी - वि . उचलण्याकरितां दोन कान , कड्या असलेले ( भांडे इ० ). [ दु + कान ] दुकाम - न . पुन्हा करावे लागलेले काम ; दुहेरी त्रास . ( क्रि० करणे ; पडणे ; होणे ). दुकामी - वि . दुकसबी पहा . दुकित्ता - वि . एकाच मजकुराची दोन ( पत्रे , कागद इ० ); अस्सल बरहुकूम नक्कल ; दुहेरी . तुम्ही सांडणीस्वाराबरोबर व खिज्मतगाराबरोबर अशी दुकित्ता पत्रे पाठविली . - ख १० . ५५०८ . दुकी - स्त्री . ( मुलांत रुढ ) शाळेत क्रमाने तिसरा येणार्या मुलाच्या हातावर मारतातत्यादोनछड्या . दुकुल - न . युग्म ; जोडी . नारी कुंजराची दुकुले । राजवल्लभे । - ऋ ६९ . [ सं . दु + कुल ] दुक्कल - स्त्री . १ ( गंजिफांचा खेळ ) राजा , वजीर व त्या खालील ओळीने असतील ती पाने समुच्चयाने ; राजा व वजीर ही पाने पडून गेल्यावर त्या खालील हुकूम जे ओळीने असतील ते समुच्चयाने दुकलीत शेवटचे जे पान असेल तो हुकूम असतो . त्याशिवाय वरील सर्व पाने दुक्कल होत . २ द्वय ; जोडी . ३ कागदाचा पतंग . अ. अभाव , निकृष्टपणा , दुष्टपणा इ० कांचे वाचक दुर उपसर्गाबद्दल समासांत योजावयाचे मराठी रुप . जसेः - दुकाळ = दुष्काळ ; वाईट काळ ; दुबळा = बलहीन ; दुर्बळ . [ सं . दुर ; दुः , दुस ; प्रा . दु ] दुआळणे - उक्रि . ( महानु . ) दुखविणे ; पिटणे ; पीडा देणे . तंवं हडपिनी वारिकी दुआळिली । - शिशु ५५८ . [ दुआळी ] दुआळी - स्त्री . पीडा ; क्लेश ; दुर्बुद्धि ; पीडा करण्याची बुद्धि . - मनको . [ दु = वाईट + आळी हेतु , इच्छा ? ] दुएत - स्त्री . दुवेत ; गर्भपात होणे ; दुपावणे ; नासवणे ; ( प्र . ) दुवेत पहा . दुकळ - पु . १ दुकाळ ; दुष्काळ ; महागाई ; महर्गता . २ ( सामा . ) ( एखाद्या पदार्थाची ) अतिशय दुर्लभता व्हावयाजोगे स्वल्पत्व ; उणीव ; कमीपणा ; अभाव . कोंकणांत लांकडास दुकळ नाही . दुकाळ पहा . [ सं . दुस + काळ ; प्रा . दुकाळ ] म्ह ० दुकळांत तेरावा महिना . दुकळणे , दुकळावणे - अक्रि . ( क्व . ) ( निंदार्थी ) ( दुष्काळ इ० कांमुळे मनुष्य इ० कानी ) अन्नाविषयी हापापणे ; लोलुप होणे ; बुभुक्षित होणे ( अधाशाप्रमाणे खाणारास किंवा घरी यथेच्छ खावयास असूनहि घरोघर जेवणास जाणारास उद्देशून निंदार्थी प्रयोगांत उपयोग ). नाही दुकळलो अन्ना । परि या मान जनार्दना । - तुगा १०४८ . असले वाईट आंबे खावयास मी केवळ दुकळावलो नाही . [ दुकळ ] - ळाचा पाया - पु . १ दुष्काळाचे पूर्वचिन्ह . २ ( व्यापक ) नाशाचे , दारिद्र्याचे पूर्वलक्षण . दुकाळा - दुकाळ - पु . १ महागाई ; दुष्काळ . २ ( सामा . ) ( एखाद्या वस्तूची , पदार्थाची ) दुर्लभता ; अभाव ; टंचाई ; उणीव . दुकळ दोन्ही अर्थी पहा . [ सं . दुष्काल ; प्रा . दुकाल ] म्ह ० १ दुकाळी माळी सुकाळी साळी = सुकाळाच्या वेळी साळ्यांच्या धंद्याचे महत्त्व वाढते तर दुकाळांत माळ्याला महत्त्व येते . २ ( कर . ) दुकाळांत खाल्ले आणि भांडणांत काढले . दुःकाळ - पु . ( महानु . ) दुकाळ . दारुणसंसारुदुःकाळी । जेणे परमानंदाची रांकधनी केली । - शिशु ५ . दुकाळणे - अक्रि . महाग , दुर्लभ , दुर्मिळ होणे . [ दुकाळ ] दुकाळ्या - वि . दुष्काळग्रस्त ; दुकाळाने पीडित झालेला . त्यांस असे जहाले की , दुकाळियास मिष्टान्न मिळते तसे जहाले . - भाब १८ . [ दुकाळ ] ०जळणे ( गंजिफांचा खेळ ) आपणांकडे खेळण्याची पाळी आल्यावर आपणाकडे असलेली दुक्कल खेळावयाची राहून जर आपण देणी देणे अथवा दुसरा खेळ खेळलो तर ती दुकलीची पाने निरुपयोगी होतात . अशा वेळी दुकलीच्या पानांतील शेवटचे पान हुकूम होतो व तोच उपयोगांत आणतां येतो . दुक्का पु . दोन चिन्हे ज्यावर आहेत असे गंजिफांतील पान ; दुव्वा ; दुरी . दुखंड वि . १ दोन भागांत विभागलेले , छेदलेले . - क्रिवि . दुभंग ( दोन तुकडे होतील अशा तर्हेने ; कापणे अथवा तत्सदृश क्रियापदांबरोबर योजतात . ( क्रि० करणे ; होणे ). [ दु + खंड = भाग , तुकडा ] दुखणी वि . दोन खणांची ( इमारत , घर इ० ). इतर नगरांची उभवणी । तिखणावरी पांचखणी । त्यांहीमाजी असती दुखणी । द्वारकापट्टणी ते नाही । - एरुस्व ३ . १३ . [ दु + खण = गाळा ] दुखांदा पु . ( राजा . ) वृक्षाच्या खोडाला दोन मोठ्या फांदुया जेथे फुटलेल्या असतात तो भाग . [ दु + सं . स्कंध ] दुखांबी वि . १ दोन खांबांच्या आधारावर उभारलेले ( घर , दालन इ० ). २ दोन खांबावर उभारलेला ( तंबू , राहुटी ). [ दु + खांब ] दुखुरी वि . खुरावर खुराच्या आकाराचे अवाळूं असलेला ( घोडा ). हा अशुभ मानितात . [ दु + खुर ] दुगण न स्त्री . ( संगीत ) ठाईचा निमपट काल ; नेहमी ध्रुपद गाण्यास जो काल लागावयाचा त्याच्या अर्ध्या कालांत ते गाणे किंवा वाजविणे . [ दु + गुण = पट ] दुगणी स्त्री . ( गो . ) तांब्याचे एक जुने नाणे ; दुगाणी . दुगस्त , दुघस्त न . ( गंजिफांचा खेळ ). गंजिफांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . जेव्हा खेळणारांपैकी फक्त दोघांचे हात झाले असतील तेव्हा योजतात . तिघांचा हात झाल्यास तिघस्त होते . दुगांडी स्त्री . घोडी . - वि . घोडा . दुगाणी स्त्री . तांब्याचे एक जुने नाणे ; अर्धा पैसा . न लाभतां तो न मिळे दुगाणी । - अकक २ . हरिराजकृत मुद्गलाचार्यविरचित रामार्यांचे भाषांतर १०२ . दुगाणी स्त्री . जनावराच्या मागच्या तंगड्यांपैकी प्रत्येक ( अनेक वचनांत प्रयोग ); दुलाची . ०झाडणे ( घोडा , गाढव इ० जनावराने ) लाथा झाडणे , मारणे . खाडिलकरांच्या गद्यावर अशा दुगाण्या झाडलेल्या पाहून मी खवळून गेलो . - नाकु ३ . ४५ . दुगामा स्त्री . घोड्यास शिकवावयाची एक चाल . या चालींत घोड्याने वाढती चवडचाल चालून मानेस खमकदार ठेवून पायांस लोंच करुन चेहरा दोन्ही बाजूंस डोलता राखावयाचा असतो . - अश्वप १ . १९४ . दुगून स्त्री . ( प्र . ) दुगन - ण पहा . दुघई वि . दोन दालनांची ; दुसोपी ( घर , इमारत इ० ). [ दु + म . घई = रुंदी , गर्मी ] दुघड पु . ( राजा . ) आंबे , फणस इ० कांचा दोन फळांचा घड . [ दु + म . घड = गुच्छ , घोंस ] दुघड वि . दोन जोडीच्या . शेक सगड्या करुं लागल्या चंचळ नारी दुघडा । - पला ७८ . दुघड , दुघड ओनाम्या वि . १ दोनदोनदां ज्यास पाठ द्यावा लागतो असा . २ ( ल . ) मंद ; मठ्ठ बुद्धीचा ; ठोंब्या ; दगडोबा ; अक्षरशत्रु . ३ अडाणी ; अनाडी ; अडमुठ्ठा ( काम करणारा , मजूर इ० ). [ दु + घडी ] दुघडी स्त्री . दुहेरी , दुमडून केल्यामुळे होणारी घडी . २ दुहेरी घडी केलेले वस्त्र , कागद . - वि . दुहेरी घडीचे ( वस्त्र , कागद इ० ). [ दु + घडी ] दुघस्त न . दुगस्त पहा . दुचश्मी चष्मी चस्मा वि . १ दोन्ही डोळे समोर दिसतील अशा रीतीने काढलेले ( मनुष्य इ० काचे चित्र ). २ दोन खणांचे ( घर , इमारत इ० ). [ दु + चश्मा ] दुचाळा पु . १ कातर चिमटा इ० दोन टोकांच्या हत्यारांपैकी प्रत्येक . २ ( ल . ) पेंच ; अडचण ; कचाटी ; किंकर्तव्यमूढ स्थिति ; द्वैतभावना . एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे । - तुगा २४३ . [ द्रु + चाळा ] दुजाईत वि . ( कों . ) दोनदां व्यालेली ( गाय , म्हैस इ० ). [ दु + जनन ] दुजांतरा , दुजांत्रा , दुजारा वि . दोन दिवसांनी येणारा ( ताप ). दुजोडी स्त्री . दोहोंकडील दोन्ही तुळयांची टोके एका खांबावर येतील असे मधोमध खांब देऊन दोन सोप्यांची केलेली एक सोप्याची रचना . [ दु + जोड = जुळणी ] दुजोर रा पु . ( बुद्धिबळांचा खेळ ) एका पगावर एकाच वेळी असलेला दोन पगांचा जोर . [ दु + जोर ] दुजोरा पु . ( एखाद्याने केलेल्या भाषण इ० रुप क्रियेस दुसर्याने तत्सदृश क्रियेने दिलेले ) अनुमोदन ; टेकू ; पाठबळ ; पुष्टि . ठरावास दुजोरा देणारा कोणी न मिळाल्यामुळे मांडणारास तो परत घ्यावा लागला . [ दु + जोर ]
|