|
पु. ( आवेश , उत्साह , ऐश्वर्य , वैभव . इ० कांचा ) प्रकर्ष ; वैपुल्य ; भर ; जोस . तो भर घोसांत मेला [ फा . गोष ] भर घोसानें , भर घोंसानिशीं , भरल्या घोंसानें - क्रिवि . सर्व शक्ति एकवटून ; नेटानें व छातीठोकपणानें ; भगीरथ प्रयत्नानें . भर घोंसानिशीं किल्ला घेतला . भरल्या घोसानें डोंगरावर चढला . घोसांत असणें - अक्रि . ( गो . घोंसार आसप ) ऐश्वर्यांत दंग असणें ; मनोराज्य करणें . पु. ( मोत्यें , फुलें इ० कांचा ) गुच्छ ; झुपका ; तुरा ; झुमका . सन्मुख भेटला राजहंस । मुक्ताफळांचा घोंस मुखीं धरूनी । - भारा . बाल १२ . २४ . - वि . मोठा ; देखणा ; पुरा ; भरपूर ; लठ्ठ व दिखाऊ ; घवघवीत . [ सं . गुच्छ ; प्रा . गोच्छ ; हिं . गुच्छा ; सिं . छुगो ] ०दार वि. ( मोत्यांचा ) घोंस असलेलें ( कर्णभूषण इ० ); घोस लागलेला ; घोसांनीं युक्त ; भरदार . ०दार स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात . फुलबाजी स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात . ०दोडका पु. दोडक्याची एक जात . यास घड येतात . घोस दोडके वांगीं सगळीं । - अमृत ७३ . ०बाळी स्त्री. मोत्यांचे घोस लावलेली कानांत घालावयाची बाळी . कोथिंबिरी , टोपण , घोंसबाळया । - सारुह ६ . २४ . घोसबाळया पर्डीच्या बाळया ल्याली सुंदर । - अफला ५५ . [ घोस + बाळी ] ०बाळे पुअव . दागिन्यांत लटकता बांधावयाचा लोलक , ताईत , करण . - जनि पारिभाषिक शब्द ३ . ०वाला पु. पैलूचा अगर बिन पैलूचा पण टोंकावर भोंक असलेला लांबट हिरा .
|