|
अ.क्रि. १ सरणें ; ढळणें ; गती येणें ; सरकणें . २ गडबडीत , दंगलींत , गोंधळांत असणें ( देश , गांव , घर ). ३ हलकलणें . [ हिं . हालना ] हालकडी - स्त्री . नथेंतील किंवा मोत्यांची कडी , घोंस . हलकडी पहा . [ हालणें + कडी ] हालचाल - स्त्री . १ सजीव अवस्थेची द्योतक क्रिया ; चेतना . २ चळवळ ; चालना ; उद्योग ; वळवळ ; चलनवलन . [ हिं . ] हालता नारळ - पु . हालविला असता आंतील पाणी वाजणारा नारळ . हालबोंदरा , हालबोंद्रा , हालबेंद्रा - वि . १ घाणेरडा ; अजागळ ; मूर्ख . २ वेडगळ ; हेकाड . ३ नालायक ; कुचकामाचा ; नपूंसक ; दुर्बळ मनाचा . ४ ( हेटकरी . ) एक शिवी . चिंध्या लावणारा . [ हालणें + बोंदर - री ; हलका + इंद्रिय ] हालविणें - सक्रि . सरकविणें ; गति देणें ; सारणें ; धामधूम करणें ; जागृत करणें ; चेतविणें ; चेवविणें . हालवून जागा करणें - १ आयासानें , प्रयासानें प्रवेश करणें . २ उठविणें ; चेतना आणणें ( सांगून , सुचवून ).
|