Dictionaries | References

खुंट

   
Script: Devanagari

खुंट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The channel of the screw of the trinket बुगडी. 15 m The stripe or bar-like seam into which are gathered the चुनी or ruffles under the arm of an अंगरखा. 16 fig. of second sense. A stake to hold on by, i. e. a patron. 17 At blindman's buff, and at खोकड or the play of खोखो. The boy who covers the eyes of the boy personating Blindman.

खुंट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A stump. An end or a point of a road. A stake driven.
खुंट होणें   To sit sulkily and still.
खुंटास खुंट उभा राहणें   Accession filling up a vacancy.
खुंटास खुंट घेणें   To take tit for tat.

खुंट

 ना.  कांड , खोड , बुंधा , सोट ;
 ना.  खांब , खुटला , मेढ , मोठी खुंटी ;
 ना.  केसांचे बुडखे ,
 ना.  चव्हाटा .

खुंट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जनावरास बांधण्यासाठी जमिनीत गाडलेले लाकूड   Ex. शेतकर्‍याने काम संपल्यावर बैलांना खुंट्याला बांधले.
HOLO MEMBER COLLECTION:
चारपायी-प्राणीस्थान
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खुंटा दांडके मेख
Wordnet:
asmখুটি
bdखुन्था
benখুঁটি
gujખૂંટ
hinखूँटा
kanಗೂಟ
kasٹِکُِیٛل
kokखूंट
mniꯎꯆꯨꯛ
oriଖୁଣ୍ଟା
panਕਿੱਲਾ
tamமாடுகட்டும்முளை
telకట్టు గొయ్య
urdکھونٹا , میخ
 noun  झाड कापल्यावर खाली राहिलेला भाग   Ex. माझ्या पायात खुंट बोचले.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujખાંપો
hinखूँटी
kasکَلَم , لٔنٛڑ
oriଖୁଣ୍ଟା
panਕਰਚਾ
tamஅடித்தண்டு
telవేళ్ళకొమ్మ
   See : खोड

खुंट

  पु. १ खालीं राहिलेला भाग ; खोड ; कांड ; सोट ; बुंधा ( झाड , झुडुप , केरसुणी , हजामत झाल्या नंतरचे केंस इ० चा ) ' समुळ फोडियेले खुंट । ' - एरुस्व १० . ७६ . २ ( मासे मारण्यासाठीं समुद्र किंवा नदी यांत ) रोविलेला खांब , डांभ . ३ ज्यामध्यें फाळ बसवितात तें नांगराचें टोंक ; खुळसा ; कोळसा . ४ गाय , म्हैस यांच्या आचळांतुन दुध येण्याअ प्रतिबंध करणारा मळ . ५ गोफण , जाळें , शिंके करण्याकरितां दोरीचें दोन पदर अथवा पेड तिरकस बाहेर ओढले जातात त्यापेकी शेवटचे तंतु पुन्हां याच रीतीनें बाहेर काढले जाऊन वळले जातात , अशा शेवटच्या तंतुपैकी प्रत्येकास खुंट म्हणतात . ६ दुध न देणारा जनावारांचा सड ; मुका , अंधाळा सड . ७ पृथ्वीचें चार कोपरे . ' हिडुं देश कोन खुंट चारी । ' - तुगा ११८ . ' चार खुंट जहागीर . ८ दणकट शरीराची गय , म्हैस , जनावर किंवा स्त्री ,' काळवीट खुंट खरे ,' - ऐपो २४२ . ९ मध्यम आकाराचा केळीचा कोंब , खोड , मोना ( मोठ्या केळीस चिकटलेला किंवा निराळा काढलेला ). १० चार रस्त्यांचा चौक ; चौहाट ; अड्डा . ११ रस्त्याचें टोंक ; शेवट . १२ ( ल .) कुंटुंब ; घरदार ; त्यापैकीं एक व्यक्ति ; वंशाची शाखा ; वंशातील मुल ; वंशाचें फल ; संतान . १३ . बुगडीचें मळसुत्र ज्यांतुन जातें तो भाग ; बुगडीचा , कुड्यांचा कानांतील भाग . १४ अंगरख्याच्या बाहीच्या चुण्या जींत एकत्र करतात ती पट्टी अथवा गजासारखी शिवण . १५ ( ल ,) आधारस्तंभ ; आश्रयदाता . १६ . ( आंधळ्या कोंशिबिरीच्या खेळांत ) आंधळ्याचें सोंग घेणाराचे डोळें झांकणारा मुलगा ; भोंग्या . १७ ( गो .) कुंपणाची काटी . १८ ( को ,) तुकडा १९ खोखोच्या खेळांतील न हालणारा गडी . ' होऊनियां खुंट बसा जपुन .' - मोगर्‍याची कविता मराठी तिसरें पुस्तक खेळ ५ पृ . ४८ . २० . ( ढोरधंदा ) अत्यंत आखुडक सळ . २१ कांठ कोपरा . ' खेटितां कुंप कांटी खुट खरटी न पाहे । ' - तुगा ३४९ . २२ स्वारी ; उतारु ( गाडीमधील ) २३ खांब ; मेढ . ' मग परमस्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें । ' - नव २४ . १५५ . २४ . जनावरास बांधण्यासाठी जमीनींत गाडलेला लांकडी खुंटा ; दांडकें . २५ वाधुर लावण्यासाठी ठोकलेल्या लांकाडांच्या मेंढी ; खुतला . - वि . ( गो .) ताठा ; नीट . ( सं . कुठ - कुंठ = स्तम्मित होणें ; प्रा . खुंट ; तुल० का . कुंटु = लांगडा ) ( वाप्र .)
०होणें   हट्ट धरुन खुंटा सारखें ताठ व स्तंब्ध बसणें .
०ळणें   वाल इ० चा एक एक दाणा लावण्यासाठी जमीनींट खुंटीनें , किंवा काठीनें टोचा , भोंक पाडणें , टोवणे खुंटास खुंट उभा राहणें - होणें - एक जातो तोंच त्याच्या जागीं दुसरा येणें ; गेलेल्यांची जागा नवीन येणारानें भरुन काढणें ; खंड पडल्याची जागा भरुन काढणें . खुंटास खुंट घेणे - जशास तसें करणें ; उसनें फेडणे . खुंटासारखा उभा राहणें - असणें - खुंटणें - खुंटाप्रमाणें ताठरणें , ताठ उभा राहणे . म्ह० आजा मेला नातु झाला खुंटास खुंट उभा राहिला खुंटावरचा कावळा = घरदार , वतनवाडी , वायकामुलें नसलेला , वाटेल तेथें राहणारा माणुस , सामाशब्द .
०कन   कर दिनी दिशीं - क्रिवि . तीव्र व हलक्या आवाजानें ; खाडदिशी ( दोन काष्ठांचा परस्परांना लागुन होणारा शब्द ) ( क्रि० वाजणे ). चुटकी , टाकी यांच्या होणार्‍या आवाजांप्रमाणें शब्द होऊन
०कळी  स्त्री. बगलकळी ; अंगरख्याच्या पाठीमागचा त्रिकोणी तुकडा . बगलेंतील पेशकळी आणि आगा असे दोन तुकडे व खुंटकळी मिळुन अंगरख्याची एक बाजु होते . खुंटण - न . खुंट अर्थ १ - २ पहा .
०पान  न. ( राजा .) केळीच्या गाभ्यापासुन निघणारें शेवटचें आणि कोंक्याच्या पुर्वी येणारें आंखुड पान
०बरा  पु. खुंटी . खुंटा पहा .
०बावली  स्त्री. १ ( राजा ). एक प्रकारची बाहुली . २ उंचीवरचा पदार्थ काढण्यासाठी चवड्यांवर उभे राहणें ( क्रि० करणें ). अशा रीतीनें खुंटबावलीवर उभें राहणें . ३ ( निंदेनें ). काम न करणारी व खुंट्यासारखी तिष्ठत राहणारी स्त्री .
०बाळी  स्त्री. स्त्रियांचें एक कर्णभुषण . ' खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर । ' अफला ५५ .
०भाजी  स्त्री. विशेष विस्तार व्हावा म्हणुन पुन्हं पुन्हा अग्रे खुडुन राखिलेली भाजी ; खुंटापासुन किंवा मुळापासुन निघालेल्या कोंब व त्यांची भाजी .
०रोग  पु. १ पुष्कळ दिवस खुंटाळ बांधुन ठेवल्यामुळें पशुंना येणारा रोडकेपणा किंवा होणारा आजार . २ ( ल .) अशा बैठेपणापासुन होणारा आजार , रोग .
०रोगी वि.  खुंटरोग झालेला . खुंटला - पु . ( ब .) गाडीच्या दोन बाजुंस ( आंतील सामान बाहेर पडुं नये म्हणुन ) लाविलेलें खुंट प्रत्येंकी - सार - वि . ( गो .) खुंटासारखा .

खुंट

   खुंट होणें
   [खुंट=खोखोच्या डावातील एकजागी बसून राहाणारे गडी] (हट्ट धरून) स्‍तब्‍ध बसणें
   स्‍थिर राहणें
   न हालणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP