Dictionaries | References

कावळा

   
Script: Devanagari

कावळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To quit the company of men. Applied also correspondingly with "Get along with you--You go to Bath--Mind your own business."

कावळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  crow.
कावळ्याच्या शापानें गाई मरत नसतात   Persons of worth are not hurt by the vile abuse of the wicked.

कावळा     

ना.  एकाक्ष , काऊ , काक , कौआ , बलिपुष्ट , वायस .

कावळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा, मासे, कीडे खाणारा, कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी   Ex. कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
HYPONYMY:
डोमकावळा
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काक काऊ
Wordnet:
asmকাউৰী
bdदाउखा
benকাক
gujકાગડો
hinकौआ
kanಕಾಗೆ
kasکاو
kokकावळो
malകാക്ക
mniꯀꯋ꯭ꯥꯛ
nepकाग
oriକାଉ
panਕਾਂ
sanकाकः
tamகாக்கா
urdکوا , کاگ , زاغ
noun  तेल ठेवण्याचे चोच असलेले भांडे   Ex. कावळ्यातून तेल ओघळत नाही.

कावळा     

 पु. 
  1. काळ्या रंगाचा , लांबट व बळकट खोंबीचा , मांस , किडे गोचीड वगैरे खाणारा , कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी ; काक . 
  2. अगस्त्याच्या फुलांतील कावळ्याच्या आकाराची काडी . 
  3. केळफुलांच्या दात्यांतील एक न शिजणारा निबर तंतु , हा काढुन मग दात्यांची भाजी करतात . 
  4. कावळी नांवाच्या वेलीचें फळ . 
  5. ( बैलगाडी ) गाडीवानाच्या चाबकाच्या टोकाला असलेला गोंडा . 
  6. ( बे .) आमटी वाढण्याचें एक सारपात्र . 
  7. ( कों .) नारळीच्या झाडाच्या शेंड्यावरीलल कोवळ्या पानांचा झुबका . - कृषि ७४८ . 
  8. ( जरतार ) कावळ्याच्या चोंचीच्या आकाराचा एक चिमटा . ( सं . काक ; ते . काकि ; सिं . काउ ; हिं . काव्वा ; इं . क्रो ). ( वाप्र .)

०शिवणे   
  1. मृताच्या दहाव्या दिवशीं त्याच्या नावानें केलेल्या पिंडास कावळ्यानें स्पर्श करणें . 
  2. स्त्री . अस्पर्श झाली असतां लहान मुलांच्या समजुतीकरितां हा शब्द वापरतात . ( कावळा शिवला म्हणजे पाप लागतें अशी समजूत ' मद्विकम तुच्छ नरा , शिवला हा जेविं काक डाग मला । ' - मोविन डाग मला । ' - मोवन १२ . ३७ . 
चें आयुष्य असणें - शंभर वर्षे म्हणजे दीर्घायुष्य असणें .  
- च्या शापानें गाई मरत नाहींत - क्षुद्र माणसानें थोरामोठ्यांना कितीहि दूषणें दिली तरी त्याचें कांहींहि नुकसान होत नाही . पांढरे कावळें जिकडे असतील तिकडे जाणें = देशत्याग करनें .  
 ( पोटांत ) कावळे कोकलणें - ओरडणे - फार भूक लागणें .  
 ( गो .) कावळे म्हातारे जावप = पुष्कळ काळ लोटणें .  
  म्ह० 
  1. कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोन खाईल = ओंगळपणा , नीचपणा , हलकटपणा याम्नी युक्त अशा माणसाबद्दल योजतात . 
  2. कावळां मोत्यापोवळ्यांचा चारा काय उपयोगी ? = गाढवास गुळाची चव काय ? 
  3. घरांत नाहीं शीत कावळ्यास आमंत्रण = अंगांत सामर्थ्य नसतां बडेजावीच्या गोष्टी बोलणें , जवळ पैसा नसतां भरमसाटपणे देणग्यांची वचनें देणें . 
  4. कावळ्यानें गु . उष्टावप = कावळ्यानें गु उष्टावण्यापुर्वी म्हणजे अगदी सकाळी . कावळे 
बुक - न . पत्रे पावत्या . बिलें इ० चिकटून ठेवण्याकरिती शिवणीपासुन दोन बोटें रंदीच्या कागदाच्या पट्ट्या कापून शिवुन तयार केलेंलें चिकटबुक . 
- ळ्याचा डोळा - पु . 
  1.  ( राजा .) एक वनस्पतीचें फुल . 
  2. ( ल .) फार पातळ ताक . 
- चें गोत - न . एखाद्याच्या घरीं कांहीं निमित्तानें जमलेला गोतावळा ; अनेक नात्यागोत्याच्या माणसांची गर्दी . झुंड वगैरे .

कावळा     

पराचा कावळा    एखादी लहानशी गोष्‍ट अतिशय फुगवून सांगणें. अगदी क्षुल्‍लक गोष्‍टीवरून एखादे मोठे अवडंबर माजविणें. अतिशयोक्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP