Dictionaries | References आ आंतील Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आंतील A dictionary, Marathi and English | Marathi English | | Of the inner side or part, interior, inner: also intestine; as आं0 फितूर-दंगा- फूट-भेद. also secret or private; as आं0 जाच-जुलूम- यातना-संतोष-दुःख-संताप. Rate this meaning Thank you! 👍 आंतील Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a interior; intestine. secret. Rate this meaning Thank you! 👍 आंतील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आंतील बाजूचा ; मधील ; अंतर्गत . जसें - आंतील फितूर , दंगा , फूट , भेद . [ सं . अंतर ] गुप्त ; अंतर्गृहांतील . जसें - आंतील जाच - जुलूम - यातना - संताप - खातें - पत्र - हिशेब - वही इ .०आंख पु. व्यापारी लोक मालावर किंमतीचा गुप्त आंकडा घालतात तो , किंवा कांहीं खूण . [ सं . अंतर + अंक ] गुप्त याअर्थी इतर उपयोग - आंतील खातें - पद - याद - वही - हिशोब इ००करारनामा पु. खाजगी रीतीनें घेतलेली वचनचिठ्ठी , करार .०जामिनकी स्त्री. आंतील जामीनदाराचें काम , धंदा .०जामीनदार पु. सरकारी रीतीनें किंवा उघड रीतीनें जामीनदार झालेल्यास आंतून जामीन राहणारा किंवा त्याला हमी देणारा .०टांग स्त्री. ( मल्लविद्या ) कुस्तींतील एक डाव ; आपल्या एका हातानें जोडीदाराचा हात आपल्या बगलेंत धरुन आपल्या दुसर्या हातानें जोडीदाराचें मनगट धरावें . ज्या बगलेंत आपण जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदाराच्या दोन्ही पायांत आपला पाय घालून , जोडीदाराच्या हातास झटका देऊन आपली मान बाहेर फिरवून , ज्या बगलेंत जोडीदाराचा मुंडा आपण धरला असेल तो आपला मुंडा जमिनीवर टेकून , जोडीदारास चीत करणें .०भोंक न. गुप्त गोष्ट ; एखाद्या गोष्टींतील व्यंग , छिद्र , दोष ; रहस्य .०मजकूर पु. ( पत्रांतील ) वृत्तांत ; मजकूर . ( ल . ) मनांतील गुप्त हेतु , मसलत .०रोग पु. गुप्त रोग . ( ल . ) जुलूम , दुर्बलता , र्हास वगैरेचें अंतस्थ , गुप्त कारण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP