|
स्त्री. शालनिर्यास ; एक ज्वालाग्राही डिंकासारखा पदार्थ . ज्यांपासून हा डिंक निघतो ती झाडे बंगाल , अबूचा पहाड व उत्तरहिंदुस्तान यांत होतात . रातकिडा . हा सरलपक्ष कीटक बिळांत राहतो . याचा रंग उदी असतो . ( ल . ) नासलेली , बिघडलेली , विचका झालेली , भंगलेली , फजीति झालेली , मोडलेली स्थिति . पिठाड , पीठ , धूळ , भुसाडा इ० पहा . हुर्रेवडी ; फटफजीती . झाडाचा पाला समजून राळ करितात . - कफा प्र . २ . चांदीसोन्याचा गट . [ सं . राल ] ( वाप्र . ) ०करणे घाबरवून सोडणे , फट फजिती दैना , दुर्दशा करणे . नाश करणे . आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुरविली शुद्ध बुद्धि केली राळ । - तुगा ४०६६ . ०पाट पु. एखाद्या जिन्नसाला नक्षी काढतांना तो जिन्नस चिकटून रहाण्यासाठी राळ लावलेला चौकोनी , वाटोळा लाकडी तुकडा .
|