|
न. घाण ; रक्त मिश्रित पू . स्त्री. चिखल , शेण , गू , इ० चा ढीग अगर पसारा ; रेंदाड ; घाण ; रबडा ; चिखलाची जागा . रेबडणे - सक्रि . ( भांडे , अंग इ० ) बरबटविणे ; माखणे ; चोपडणे ; फासणे . - अक्रि . बरबटलेले असणे किंवा होणे ; ( रस्ता , शरीर , नाक , तोंड , भांडे , वस्तु इ० ) माखलेले असणे . रेबडी - टी - स्त्री . ( राजा . ) पाघळून पातळ झालेला गूळ . बिलबिलीत झालेले फळ ; अविकल्याने आंबा , फणस इ० चा थिलथिलित झालेला गीर ; कुजून शेण झालेला जिन्नस .
|