|
अ.क्रि. १ विघरणें ; विरघळणें ; द्रवणें ; पाझरणें . २ कोमेजणें ; फिकें पडणें ; निस्तेज होणें . गजबजले लोक समस्त । सकळ रंग वितुळला । ३ ( ल . ) फाटाफूट होणें ; पांगापांग होणें ; विस्कळित होणें ; अस्ताव्यस्त पसरणें ( आभाळ , ढग , सैन्य , राजकारण . पंचाईत , जमाव , अज्ञान वगैरे ). तुझिये कृपेचे . न बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें । - दा १ . २ . ३ . ४ विरणें ; फिसकटणें ; मधल्यामध्येंच मोडणें ; नाहीसें होणें ; जिरणें ( बेत , मसलती , युक्ति , कल्पना ). ५ दयेनें , करुणेनें मन आर्द्र होणें ; अंतःकरण पाझरणें . [ सं . वि + ताल ]
|