|
स्त्री. १ सोबत ; संगत ; समागम ; साहचर्य . एर्हवी मधुकराचा साती केवि जीणवे । - शिशु २६६ ; तुगा ३०७५ . २ सोबती ; जोडीदार . ३ तिरकमठयाला बांबूची बारीक बांधतात ती कांब . - बदलापूर १२६ . [ साथ ] साती - पु . सोबती ; साथीदार . स्त्री. १ बाजार ; हाट . - ज्ञा १३ . ३२० . गोरस घेऊनी सांते निघाल्या गौळणी । - तुगा १२८ ; दहिसात . २ जत्रा ; मेळा . ३ ( गो . ) आठवडयाचा बाजार . साती - स्त्री . ( ना . ) लहान बाजार . स्त्री. १ क्रम ; आवृत्ति ; सांतरे ( विशेषतः साथीच्या रोगाचें ). २ एकाच प्रकाराची , पद्धतीची , पदार्थाची पुनरावृत्ती . उदा० भाकरीची - भाताची सात ( भोजनास ); मुलांचीमुलीची सात ( बायकोस ). ३ सतत प्रवाह ; परंपरा . [ सं . सतत ] स्त्री. एक विवक्षित मासा . स्त्री. साथीचा रोग ; सांथ . स्त्री. ग्रामदेवतेपुढे नारळ फोडणें ( दुसर्यास किंवा आबणीपूर्वी भगतानें ). - बदलापूर ३२० . [ ? सं . साती = दान ] वि. १ ७ संख्या ; सप्त . २ ( ल . ) संख्येनें मोठा , परिपूर्ण ; फार . उदा० सातताड उंच ; सात लबाड , सात पडद्यांत बसणे , इ० . [ सं . सप्त ; प्रा . सत्त ; हिं . सात ] म्ह० १ सात सुडे ( सा ) तरी भागुबाईचे कुले उघडे . २ सात सुगरणी अन् भोपळा अळवणी . ३ सात पाच रंभा , पाण्याचा नाही टिंबा . ०आश्चर्यें नअव . ( बालभाषा ) १ आकाशाला खांब नाही . २ तळहाताला केस नाही . ३ समुद्राला झाकण नाही . ४ घोडयाला स्तन नाही . ५ देवाला आईबाप नाही . ६ जिभेला हाड नाही . ७ केसाला रक्त नाही . ०ताडउंच अतिशय उंच . ०धातु पु. सोनें , चांदी , पितळ , तांबे , शिसें , कथील व पोलाद . ०पदरी पु. ( तंजा . ) स्त्रियांचा गळ्यंतील एक दागिना . मणी पु. ( तंजा . ) स्त्रियांचा गळ्यंतील एक दागिना . ०पांच वि. १ पंच्याहत्तर . ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । - ज्ञा१० . ३०२ . २सात ( धातु ) व पांच ( महाभूतें ). सातापांचाचें गोठले । प्रारब्धें आकारले । - तुगा २००४ . पांच करणें - जीत पुष्कळ विसंगतपणा आहे अशी गोष्ट सांगणें ; ताळमेळ नाही असे बोलणें . ०पानी वि. उगवल्यापासून सात पानें आली म्हणजे ज्याला फळ येते असा ( वेल , दूध भोपळा , कांकडी इ० चा ). ०पुडी स्त्री. ( खाटिकी शब्द ) आतडयाचें वेष्टन . ०पुडीगलांड न. सात वेळां पू होऊन फुटणारें गळूं ( यास सात पापुद्रे आहेत असा समज ). ०पुती स्त्री. १ घडघोसाळीचा वेल . २ सात मुलगे असणारी बाई ; साता मुलांची आई . म्ह० एकपुती रडे आणि सातपुती रडे . ०पुतें न. घडघोसाळें ( फळ ). ०पुर्या स्त्रीअव . प्रसिद्ध अशी सात पवित्र नगरें . अयोध्या मथुरा माया । काशी कांची अवंतिका । द्वारावती आदि आल्या । सर्वही मोक्षदायिका । - विष्णूची भूपाळी . ०फिरक न. एक शोभेच्या दारूचें झाड . याला सात फेरी ( फिरती चक्रे ) लावतात . तीं पेटल्यावर फिरूं लागतात . ०भाई स्त्री. शेतांतील किडे वेचून खाणारा एक प्राणी . मौक्तिक स्थानें - पुअव . १ शिंप , २ डुकराचें मस्तक , ३ सर्पांचें मस्तक , ४ शंख , ५ मत्स्य , ६ बेडुक , ७ हत्ती . ०लज्जा स्त्रीअव . पुढील सात प्रकारच्या लाजाः - जनलज्जा , मनोलज्जा ; वयोलज्जा ; धर्मलज्जा ; कर्मलज्जा ; जातिलज्जा ; कुललज्जा . ०लाजा बांधणें - अतिशय निर्लज्ज असणें . पदरी बांधणें - अतिशय निर्लज्ज असणें . ०वडा पु. ( आठवडा , पंधरवडा याप्रमाणें बनविलेला शब्द - सुमारें ८०।९० वर्षापूर्वी ). १ सात दिवसांचा काल . २ सात दिवसांचा एकंदर हिशेब . ०वण वीण - स्त्रीपुन . एक झाड . याच्या एका डेंखास सात पानें असतात . सप्तपर्णी . सरल कुटज वट - वृक्ष सातवण प्लक्ष दाडिमी चांफा । नरहरी - गंगारत्नमाला . [ सं . सप्तपर्ण - सत्तवण्ण - सातवाण - सातवण ] ०वळा वळी सातोळा - वि . १ सातव्या महिन्यांत जन्मलेले ( मूल ) २ सातव्या महिन्यांत प्रसूत झालेली ( स्त्री . ) ०वाकडी स्त्री. सात दिवस एकसारखी पावसाची झड . अमृताची सातवांकुडी । लागो कां अनुघडी । - ज्ञा १६ . ६४० . - एभा २३ . ८५० . ०वार रविवारादि आठवडयाचे सात दिवस . ०वेउळी स्त्री. सात नांग्यांची इंगळी . कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळि मिळे । - ज्ञा १६ . २५९ . ०सडका स्त्री. अव . उष्णतेने हत्तीच्या गंडस्थळातून वाहणारा मदाचा स्त्राव . ( क्रि० सुटणें ). ०सडका १ स्वच्छंदी , स्वैरे बनणे . २ माजणें ; उन्मत्त होणें . सुटणे १ स्वच्छंदी , स्वैरे बनणे . २ माजणें ; उन्मत्त होणें . ०सवाई सवाईनें - क्रिवि . १ सातपटीपेक्षा आधिक्यानें ( गुणादिकांत ); सातपट . २ ( ल . ) अतिशयोक्तीनें ; अतिशय मोठयां प्रमाणांत ; फारच अधिक ; वरचढ . तुमच्या घोडयापेक्षा आमचा घोडा सातसवाईनें चांगला आहे . ०सायास साय - या - पुस्त्रीअव . अतिशय , पराकाष्ठेचे परिश्रम . सातसायःसांनी असा बहुधा प्रयोग येतो . ०साया अतिशय काळजीने , सोपस्कारानें वागविणें ; फार परिश्रम घेणें . [ सात + सायास ] सातरी - स्त्री . १ सात दिवसांचा काल . २ सप्तक ; साताचा समुदाय . सातरे पहा . सातरें - न . १ सात अहोरात्रपर्यत पाऊस वारा इ० ची झोड . पावसाचे - वार्याचें सातरें . २ सहा दिवस मध्यें जाऊन सातव्या दिवशी हिंवाची येणारी पाळी . ३ ( ल . ) कधीमधी मिळणारी इष्टानिष्ट गोष्ट सतत कांही दिवस मिळत गेल्यास म्हणतात . पंधरा दिवस क्षीरभोजनाचें सातरें लागलें होतें . ४ सात दिवसाचा काल ; सप्ताह . - ज्ञा १७ . ९८ . ही मात्रा एक सातरे घे . सातवी - स्त्री . मूल जन्मल्याच्या सातव्या दिवशी करावयाचा कुलाचार ( नामदेव समाजांत रूढ ). साताकाळजांच्या पलीकडे ठेवणे - फार फार जपणें . सातागुणांचा खंडोबा - पु . १ अनेक दुर्गुण आणि खोडी यांनी युक्त असा इसम . २ अनेक व्याधी , रोग ज्याच्या मागे लागले आहेत असा इसमः अठरा गुणांचा खंडोबा पहा . साताजन्माचा वैरी - पु . फार जुना , मोठा वैरी ; हाडवैरी . डोक्यांत दगड घातला तर साता जन्माचा वैरीसुद्धा रडायला लागेल . - भा २७ . साता नवसांचा - वि . फारा दिवसांनी , नवसासायासांनी झालेला ( बाळ ); ( ल . ) फार लाडका . सातां नवसांचे हें एकुलतें एक लाडके बाळ । उडण्या बागडण्यांतचि बालपणी घालवीतसे काळ । - मोगरे . साता समुद्रांच्या पलीकडे - फार फार दूर अशा अर्थी . साता समुद्राच्या पलीकडे ठेवणें - फार बंदोबस्तानें कोणास मागमूस लागू न देतां ठेवणें . सातासायासांनी - क्रिवि . फार परिश्रमांनी . सातारें - वि . सात महिन्यांचे ( जन्मलेले मूल ) म्ह० सातारें आणि म्हातारें आठ आणि घाट ( त ). ( याचा विशेषणासारखाहि उपयोग करतात ). साताळ - पु . ( व . ) सात दांत असलेला बैल . साताळशी - वि . अतिशय आळशी . [ सात = सातपट + आळशी ] सातिव , सातेरूं - न . ( कों ) जमीनीत ( वारुळांत ) लागणारे व सात पोवळी असणारें मोह . साती - अ . सातानें गुणुन ; सातपट ( पाढयांत उपयोग ). एक साती सात . सातेरें , सात्रें - सातरें पहा . सातोळा - वि . सातवळा पहा . सात्रक - न . सातरें ; सात दिवसांचा काल . करणें अतिशय काळजीने , सोपस्कारानें वागविणें ; फार परिश्रम घेणें . [ सात + सायास ] सातरी - स्त्री . १ सात दिवसांचा काल . २ सप्तक ; साताचा समुदाय . सातरे पहा . सातरें - न . १ सात अहोरात्रपर्यत पाऊस वारा इ० ची झोड . पावसाचे - वार्याचें सातरें . २ सहा दिवस मध्यें जाऊन सातव्या दिवशी हिंवाची येणारी पाळी . ३ ( ल . ) कधीमधी मिळणारी इष्टानिष्ट गोष्ट सतत कांही दिवस मिळत गेल्यास म्हणतात . पंधरा दिवस क्षीरभोजनाचें सातरें लागलें होतें . ४ सात दिवसाचा काल ; सप्ताह . - ज्ञा १७ . ९८ . ही मात्रा एक सातरे घे . सातवी - स्त्री . मूल जन्मल्याच्या सातव्या दिवशी करावयाचा कुलाचार ( नामदेव समाजांत रूढ ). साताकाळजांच्या पलीकडे ठेवणे - फार फार जपणें . सातागुणांचा खंडोबा - पु . १ अनेक दुर्गुण आणि खोडी यांनी युक्त असा इसम . २ अनेक व्याधी , रोग ज्याच्या मागे लागले आहेत असा इसमः अठरा गुणांचा खंडोबा पहा . साताजन्माचा वैरी - पु . फार जुना , मोठा वैरी ; हाडवैरी . डोक्यांत दगड घातला तर साता जन्माचा वैरीसुद्धा रडायला लागेल . - भा २७ . साता नवसांचा - वि . फारा दिवसांनी , नवसासायासांनी झालेला ( बाळ ); ( ल . ) फार लाडका . सातां नवसांचे हें एकुलतें एक लाडके बाळ । उडण्या बागडण्यांतचि बालपणी घालवीतसे काळ । - मोगरे . साता समुद्रांच्या पलीकडे - फार फार दूर अशा अर्थी . साता समुद्राच्या पलीकडे ठेवणें - फार बंदोबस्तानें कोणास मागमूस लागू न देतां ठेवणें . सातासायासांनी - क्रिवि . फार परिश्रमांनी . सातारें - वि . सात महिन्यांचे ( जन्मलेले मूल ) म्ह० सातारें आणि म्हातारें आठ आणि घाट ( त ). ( याचा विशेषणासारखाहि उपयोग करतात ). साताळ - पु . ( व . ) सात दांत असलेला बैल . साताळशी - वि . अतिशय आळशी . [ सात = सातपट + आळशी ] सातिव , सातेरूं - न . ( कों ) जमीनीत ( वारुळांत ) लागणारे व सात पोवळी असणारें मोह . साती - अ . सातानें गुणुन ; सातपट ( पाढयांत उपयोग ). एक साती सात . सातेरें , सात्रें - सातरें पहा . सातोळा - वि . सातवळा पहा . सात्रक - न . सातरें ; सात दिवसांचा काल .
|