|
मध्यस्थित दोन कायम ऊतकांमध्ये असलेले अथवा वनस्पतीच्या दोन्ही टोकास नसून अक्षावर मध्ये असलेले (ऊतक, कोशिका, वर्धनशील भाग इ.) i.growth मध्यस्थित वृद्धि (वर्धन) अवयवाच्या टोकास नसलेली (इतरत्र असलेली) वाढ, उदा. काही एकदलिकित वनस्पतीत पेऱ्यांजवळ अधिक काळ वाढ चालू राहते. काहीत पानांचीही वाढ तळाशी अधिक वेळ चालू असते. i. inflorescence मध्यस्थित पुष्पबंध प्रमुख अक्षावरच्या फुलोऱ्यानंतर पुन्हा त्याच अक्षावर वाढ होऊन फुलोरा येणे उदा. अननस. i. meristem मध्यस्थित विभज्या वनस्पतींतील (प्राथमिक वाढीनंतर) द्वितीयक वाढ (प्रकाष्ठ, परिकाष्ठ, त्वक्षा, उपत्वक्षा इ.) चालू ठेवून खोड, शाखा व मुळे यांची जाडी (परिघ) वाढविणारे व त्या त्या अवयवांतील प्रारंभिक ऊतकांमधून आढळणारे वर्धनशील ऊतक. उदा. ऊतककर, त्वक्षाकर पहा meristem cambium
|