|
कुंचल (कुचला) कुल, लोगॅनिएसी कुंचला (काजरा) निर्मळी, पपीटा, काजरवेल व तत्सम इतर द्विदलिकित वनस्पतीचे कुल. याचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांनी किराईत गणात (जेन्शिएनेलिझ) केला असून हचिन्सन यांनी लोगॉनिएलीझ या गणात केला आहे, प्रमुख लक्षणे - समोरासमोर किंवा वर्तुळाकार व साधी व उपपर्णे असलेली पाने, वृक्ष, क्षुपे, औषधी व लता, छदे व छदके असलेली, नियमित, द्विलिंगी, ४- भागी फुले, दोन जुळलेल्या किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक किंवा दोन कप्पे व अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात सपुष्क बिया
|