|
विभज्या, विभाजी ऊतक ज्यापासून पुढे विशेष प्रकारची ऊतके, अवयव व उपांगे बनतात असे विकसनशील (सतत नवीन कोशिका निर्माण करणारे) ऊतक किंवा एकच कोशिका अथवा अनेक ऊतकांचे थर, खोड, मूळ, शाखा यांच्या टोकास, तसेच विशेषतः द्विदलिकित वनस्पतींच्या व प्रकटबीज वनस्पतींच्या अवयवांतील काही वर्धनशील स्थानांत, इतर स्थायी ऊतकांसन्निध अशी ऊतके आढळतात, नेचाभ वनस्पतींच्या व काही कायक वनस्पतींच्या विभज्येत एकच कोशिका असते. m. primary प्राथमिक विभज्या प्रारंभापासून कार्यक्षम असणारा व कोवळ्या अवयवांच्या सर्व ऊतकांची निर्मिती करणारा ऊतकसमूह, खोडाच्या व मुळांच्या टोकास असलेल्या ह्या अग्रस्थ विभाज्येमध्ये तीन भाग (आद्यत्वचा, पूर्वाएतककर व तल्पविभज्या) आढळतात, पहा protoderm, promeristem, ground meristem, procambium m.secondary द्वितीयक विभज्या स्थायी (कायम) पण जिवंत कोशिकांच्या समूहापासून (ऊतकापासून) बनलेले वर्धनशील ऊतक, उदा. त्वक्षाकर पहा phellogen, interfascicular cambium m. merous - भागी एखाद्या अवयवातील (किंवा इंद्रियातील) भागांची संख्या दाखविणारा प्रत्यय उदा. त्रिभागी, पंचभागी इ. पहा trimerous, pentamerous cambium phellogen
|