Dictionaries | References

उगी

   
Script: Devanagari
See also:  उगा

उगी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Without speaking, moving, doing; silent, at rest or ease.

उगी

 क्रि.वि.  उगला , गप्प , निमूट , मुकाटयाने , स्वस्थ , हालचाल न करता .

उगी

 क्रि.वि.  गुपचूप ; उगला . उगा पहा . वयनीसाहेब , असें उगी बसून आम्ही सोडणार नाहीं . - रत्नकांता ५ . ४ . ( व . ) ( गाणें ) उगीउगी , चोळी शिवीन मुगी , लुगडं घेईन लाल सासुर्‍या जाल . ( रडत असलेल्या मुलीला थट्टेनें म्हणतात . )
०करणें   होणें - रडावयाचें थांबविणें ; शांत करणें ; गप्प करणें , होणें . काय झालें सुशिलेला ? असें म्हणून तिला त्यांनीं युक्तीनें क्षणार्धांत उगी केलें . - सुदे ७ .
०राहणें   शांत होणें . उगी राहें आतां बहुत वदतां ओष्ठ सुकले । - सारुह ७ . ९९ . [ का . उके = गप्प , ह . का . उगी - भिणें ]

उगी

   उगी करणें-राहणें-होणें
   रडावयाचे थांबविणें
   गप्प करणें
   शांत होणें, करणें
   शोकापासून परावृत्त करणें, होणें. ‘काय झाले सुशिलेला? असे म्हणून तिला त्यांनी क्षणार्धात उगी केले.’-सुदे ७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP