|
स.क्रि. न. ( कों . ) खळ्यावर नुकत्याच मळलेल्या धान्याचें अंदाजानें माप करण्याकरितां योजतात ती टोपली . [ उलट ] पालथें करणें ; उलथणें ; उपडें करणें . ( वस्त्राची ) आंतील बाजू बाहेर करणें ; वळविणें ; उरफाटें करणें . एखादी गोष्ट पुन्हां करणें ; पुनरावृत्ति , उजळणी करणें ; तपासणें . ( धान्य वगैरे पुन्हां मोजणें , लेखन तपासून पाहणें , ज्ञानाची , अभ्यासाची उजळणी करणें ). पार पाडणें ; पुरें करणें ; संपविणें ( एखादें काम , भानगडीचा हिशोब वगैरे ). हें सारें लिहिणें पडलें आहे , हें उलटावयास मला दोन महिने पाहिजेत . उलगडणें ; सोडविणें ; स्पष्ट करणें ; अर्थ सांगणें ( एखादा प्रश्न , कोडें , स्वप्न , भास वगैरेचा ). - अक्रि . उलंडणें ; पालथें होणें . मागें फिरणें ; विरुद्ध दिशेनें जाणें . पुन्हां उचल खाणें ; पुन्हां सुरु होणें ( रोग , सांथ वगैरे ). संपणें ; निघून जाणें ; मागें पडणें ( हंगाम , काल , वय वगैरे ). उ० तिशी , चाळिशी , साठी उलटणें . उलटून गोष्टी सांगणें - जाबसाल करणें ; उलट उत्तर करणें ; उद्धटपणें बोलणें . उलटून बोलणें - पुन्हां बोलणें ; परत म्हणणें . प्रत्युत्तर करणें ; उर्मटपणानें उत्तर देणें .
|