|
पु. १ वध ; ठार मारणें ; उच्छेद ; संहार . पाता त्या उभयांस मी मज विधि घातास योजीतसे । - र ११ . २ आघात करणें ; आघात ; प्रहार ; मारा ; घाव ; तडाखा . - ज्ञा ३ . २१६ . धांवोनि हाणिती रथातें । एकेंचि घातें शतचूर्ण । - एरुस्व ८ . ४६ . ३ ( कामाचा , धंद्याचा , व्यवहाराचा , मसलतीचा , योजनेचा ) बिघाड ; चकाचूर ; नाश ; नासाडी ; विध्वंस ; उच्छेद ; ( एखाद्या मनुष्याचा ) नाश ; हानि ; नुकसान . ( क्रि० करणें ). म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया । - ज्ञा ६ . ७० . राहूचा घात केला विषसहजनिला कोण सेवील त्याला । [ सं . घात = वध , नाश ] ( वाप्र . ) घातणें - अक्रि . घात करणें ; मारणें . - शर . ( या शब्दापासून सामासिक शब्द वाटेल तसे साधिले आहेत . समासांत हा शब्द पूर्वपदीं ( अ ) अथवा ( आ ) उत्तरपदींहि योजतात . उ० ( अ ) आत्मघात ; पक्षघात ; प्राणघात ; सर्वस्वघात ; शस्त्रघात इ० . ( आ ) घातयोग ; घातकरण ; घातवेला ; घाततिथि इ० ( पहिल्या प्रकारांत या शब्दाचा नाश , प्रहार या अर्थी व दुसर्यांत अशुभ , अमंगल या अर्थी उपयोग होतो ). सामाशब्द - घातक , घातकी - वि . घातुक ; हिंसक ; मारक ; नाशकारक ; अनर्थकारक ; अपकारक ; अपायकारक ; नाश करणारा ; ठारे मारणारा . [ सं . ] स्त्री. ( शेती इ० कांच्या कामांची , ऋतुपरत्वें येणार्या , पिकणार्या , धान्याची ) योग्य वेळ ; मोसम ; हंगाम . उ० पेरण्याची घात ; कापण्याची घात ; आंब्याची घात ; उंसाची घात ; लग्नाची घात इ० या दिवसांत उत्तरा व हस्त या पावसानें पेरणीस घात थोडी उशिरां आली आहे . - खेया १६ . [ ] ( वाप्र . ) पु. १ ( गणित ) समान संख्यांचा गुणाकार ; एका संख्येला त्याच संख्येनें गुणिलें असता त्यास त्या संख्येचा घात केला असें म्हणतात ; त्याच संख्येला त्याच संख्येनें गुणण्याची आवृत्ति अथवा त्या आवृत्तीच्या संख्येचा अंक , तीन या संख्येचा नऊ हा द्विघात व सत्तावीस हा त्रिघात आहे . [ सं . ] ०करी वि. १ ठार मारणारा ; वध करणारा ; मारेकरी . २ उपद्रव करणारा ; अपायकारक ; नाशकारक ( वस्तु मनुष्य , जिंदगी ). [ घात + करणें ] ०कर्म न. एखाद्या संख्येचा निर्दिष्ट घात करणें ; एखाद्या संख्यला त्याच संख्येनें निर्दिष्ट केलेल्या वेळां गुणण्याची क्रिया . [ घात = गुणाकार + कर्म = क्रिया ] ०घेणें ( एखाद्या , मनुष्याचा , कार्याचा , मसलतीचा ) आणीबाणीच्या वेळी नाश करणें , मातेरें करणें ; बुडवणें ; ( एखाद्यास आलेली संधि घालवून देऊन त्याची निराशा करून त्यास लुबाडणें . ( एखाद्या मनुष्याची , कामाची ) संधि दवडणें , हुकविणें . कापणीची घात पावसानें नेली . घातांचे दिवस - पुअव . १ हंगामाचे दिवस . २ ( ल . ) सत्तेचा , चलतीचा भरभराटीचा , उपभोगाचा काळ . दिवस . ०प्रकाशक वि. ( बीज . ) एखाद्या संख्येस त्याच संख्येनें किती वेळां घात करावयाचा , गुणावयाचें , गुणिलें आहे तें दाखविणारा ( आंकडा , अंक ). हा अंक मूळ संख्येच्या डोक्यवर लिहितात . उदा० ३ यांत ६ घातप्रकाशक समजावा . [ घात + प्रकाशक = दाखवणारा ] ०घेणा वि. घातकी . पुढल्या घात शब्दाखालीं पहा . ०घेणा घेण्या - वि . अवसानघातकी ; आणीबाणीच्या वेळीं घात , दगा करणारा . जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी । आणि सेखीं भीड करी । घात घेणा । - दा ५ . २ . २६ . [ घात + घेणें ] ०चतुर्दशी स्त्री. भाद्रपद वद्य चतुर्दशी या दिवशीं लढाईंत अथवा अपघातानें मेलेल्या पिरतांचे महालय श्राध्द करतात . [ सं . ] ०वाफ स्त्री. एकदां पर्जन्यवृष्टि होऊन गेल्यानंतर पुन्हां पर्जन्यवृष्टि होईपर्यंतचा ( जमीनींतून वाफ इ० निघत असलेला ) पेरणीस अत्यंत अनुकूल असा काळ . ( क्रि० संभाळणें ; जपणें ). क्षेत्र गुणें बीज अंकुरे । तें अनंतधावृत्ती विकारें । घातवाफ ते आदरें । साधूनि घेतली । - गीता १३ . १७६ . [ घात + वाफ ] ०चतुष्टय न. ( ज्यो . ) घातकारक , अनिष्ट असा चौकडा ; घातचंद्र , घाततिथि , घातनक्षत्र व घातवार यांचा समूह . [ घात + च्तुष्टय = चारांचा समुदाय ] ०चंद्र पु. ( ज्यो . ) अशुभ नक्षत्रीं आलेला चंद्र ; हा अनिष्टकारक असतो . [ सं . ] ०तिथि स्त्री. ( ज्यो . ) अशुभ , अनिष्ट तिथि . [ सं . ] ०नक्षत्र न. ( ज्यो . ) अशुभ नक्षत्र [ सं . ] ०पात पु. १ ( व्यापक ) ठार मारणें ; पंगू , लंगडा , अधू करणें ; हत्या , अपकार करणें . २ जाळपोळ ; नाश ; वध ; तोटा ; इजा ; अपकार . मनुष्यानें कोणाचाही घातपात करूं नये . [ घात + ठार मारणें + पात = पडणें , पाडणें ] ०पाती वि. घातपात करण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो ; अपकारी ; दुष्ट . [ घातपात ] ०मारॉ मारावणॉ - वि . ( गो . ) घातकी ; दुष्ट . [ घात + मारणें ] ०वार पु. ( ज्यो . ) आठवडयाच्या सात दिवसांपैकीं ( एखाद्यास ) अनिष्ट असलेला दिवस ; ज्या दिवशीं एखाद्याचें कोणतेंहि काम सिध्दीस जात नाहीं असा अशुभ , अनिष्ट दिवस . राजाची निघाली स्वारी मशालची म्हणे माझा घातवार . ०वेळ स्त्री. १ घातुक , अनिष्ट वेळ . २ मरणाचा , घोर संकटाचा , अरिष्टाचा , समय ; जिवावरचा प्रसंग ; प्राणसंकटाची वेळ . [ घात + म . वेळ ] घातीव - न . प्राणघातक शस्त्र . कीं अर्थसाधक श्रोता पूर्ण । परी घातीवे घेणार प्राण । - नव १८ . १६९ . [ घात ] घातुक - वि . १ घातक ; हिंसक ; ठार मारणारा ; प्राणनाशक ; क्रूर ; नाश करणारा . घातुक पक्षी . - प्राणिमो ६३ . २ अपायकारक ; अनिष्ट ; दुष्ट ; घातक पहा . [ घात ]
|