|
वि. शेवटचा ; अंत्य ; अंतीचा ; अंतिम . [ सं . ] सामाशब्द - न. ( गो . ) मुळांच्या अतिवृध्दीमुळें जमिनीस येणारा घट्टपणा , टणकपणा . ०काल पु. शेवटची वेळ , घटका ; मरणकाळ . ०कोटी पु. शेवटचा उपाय ; अंतिम साधन . ०गति स्त्री. शेवटली गति ; मोक्ष . ०ज पु. धाकटा मुलगा . हा मोठा मुलगा व हा चरमज आहे . [ चरम + ज ] ०प्रत्यय पु. ( व्या . ) ज्यावरून दुसरे प्रत्यय होत नाहींत ते प्रत्यय . [ सं . ] ०युक्ति स्त्री. शेवटचा उपाय , हिकमत , तोड . ०लक्ष्य न. खरी खुरी गोष्ट ; अंतिम , अखेरचें , अगदीं सत्य ; अखेरचें ध्येय , निर्णय . ब्रह्मज्ञान पहा . [ सं . ] चरमावयव - स्त्री . शेवटचा , अखेरचा भाग , अंश . चरमावस्था - स्त्री . शेवटची स्थिति .
|