Dictionaries | References

चिट्टी

   
Script: Devanagari
See also:  चिटवी , चिटी , चिठी , चिठ्ठी

चिट्टी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Used of one who struggles on through a desperate sickness, and recovers.

चिट्टी     

 स्त्री. चिटी पहा . १ छोटें पत्र . २ हुंडी . [ सं . चिट = निरोप घेऊन पाठविणें - चिट्टीका - चिट्टी ; - भाअ १८३२ ; तु० हिं . चिठ्ठी ; इं . चिट ] चिठ्ठी उतरणें - ( वर किंवा विषयीं या शब्दयोगी अव्ययास जोडून उपयोग ) मरण्याची सनद मिळणें . ( श्रीमंताची ; देवाची इ० ). चिठ्ठी उतरणें - एखाद्याकडून पैशाची विलक्षण मदत होणें . चिठ्ठी टाकणें , चिठया टाकणें - आपल्या मनांत जो प्रश्न असेल त्याची होकारार्थी व नकारार्थी अथवा संभाव्य असतील तितकीं उत्तरें कागदाच्या सारख्या निरनिराळया चिठ्ठयांवर लिहून त्या चुरगळून देवासमोर टाकून आपल्या प्रश्नाचें बरोबर तें उत्तर देण्यास प्रार्थून त्या चिठ्ठयांपैकी एक लहान मुलास उचलावयास सांगून अथवा जीवर पहिल्यानें माशी बसेल अशी चिठ्ठी वाचणें आणि तींत लिहिलेलें आपल्या प्रश्नाचें उत्तर असें समजणें . चिठ्ठी फिरविणें , माघारें टाकणें - मरणाचें आमंत्रण नाकारणें ; असाध्य दुखण्यांतून बरें होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP