|
पु. स्त्री . सोन्याचांदीच्या पत्र्यावर ठसे उमटावयाचें सोनाराचें एक साधन . [ चौ + घडा ] पु. १ देवालयांतून , राजवाडयांतून नित्य चार , चार घटकांनीं वाजविण्याकरितां कालू , नगारे , नौबती , सूर , सनई इ० . वाद्यांचा संच . - शर . प्रत्येकी दोन याप्रमाणें दोन मनुष्यांनीं वाजवावयाच्या चार नगार्यांचा समुदाय . यापैकीं दोन नगारे व दोन टिमक्या - झिला असतात . यावरून नौबती , सूर , सनई इ० . वाद्यांच्या समुदायासहि हाच शब्द लावतात . झडतो नामाचा चौघडा । - भज ६३ . २ एक मान ( चौघडा बाळगण्याचा ). हा मराठी राज्यांत विजयी सरदारास मिळे , त्याबद्दल सरकारांतून त्यास सालीना १२०० रु . ची नेमणूक मिळे . [ सं . चतुर + घटि = घडी , घटिका ; चतुर + घट = घडा ] ०वाजणें ( कर्त्याची षष्ठी ). ( ल . ) एखाद्याची बदनामी होणें . चौघडी , चौघडया - वि . चौघडयांतील नगारा व झील वाजविणारा . [ चौघडा ]
|