Dictionaries | References

झडणें

   
Script: Devanagari

झडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jhaḍaṇēṃ v i To be shed or cast in a continued manner--leaves, blossoms, fruits, hair. 2 To waste away--the flesh &c. &c. Ex. जरि जिव्हा जाय झडोनी ॥ किडे पडोत तात्काळ ॥. 3 To fade; to lose brightness, clearness, freshness--colors, pictures, writing. 4 To be in animated or smart action--the चौघडा or royal band, the झांज or cymbals, a fight or dispute: to be firing--guns, musketry. 5 To be under regular issue or free and brisk course of payment or receipt--wages of troops, monies. 6 To decline, break, give way--a building, a tiling, any fixed arrangement.

झडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To be shed or cast in a continued manner. To waste away-the flesh &c. To fade. To be in animated or smart action.

झडणें

 अ.क्रि.  १ ( डोक्याचे केंस , शरीराचे अवयव , फळें , पानें इ० ) एकसारखें गळणें ; गळून पडणें . हे हातपाय झडून जावोत . - नामना ८३ . २ झिजणें ; क्षीण होणें ; रोडावत जाणें . आठ दिवस छटाकी बंद होतांच बावांचें दोंद झडलें . ३ ( रंग , चित्रें , लेखन इ० ) निस्तेज , फिकें होणें . ४ ( ल . ) अंग चोरणें ; अंग संकुचित करणें . कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर । - दा १९ . १ . ११ . कुणी पदर धरून आड झडुन उभ्या राहती । - प्रला २३२ . ५ तुटणें ; छिन्न होणें . नाश पावणें . जरि जिव्हा जाय झडोनि । ( इमारत , छप्पर , व्यवस्था , संस्था इ० ) मोडणें ; ढासळणें . [ सं . शद प्रा . झड ; म . झड ] झडणी , झडणूक - स्त्री . झडण्याची गळण्याची , गळून पडण्याची क्रिया . [ झडणें ] झडतपडत - क्रिवि . ( प्र . ) पडतझडत . १ सांडतसांडत ; गळतगळत ; टपकतटपकत ; झरतझरत ( गवत , पानें , वाळू , राख इ० नेत असतांना ). २ धडपडत ; कष्टाकष्टानें ; ठेंचाळत ; मोठया दु : खानें ; कसेंतरी . [ झडणें + पडणें ]
 अ.क्रि.  १ ( चौघडा , झांज इ० वाद्यें वादविवाद इ० जोरानें ) वाजणें . झडे चौघडा अंबेचे पुढें । - पाळणेसंग्रह पृ . ६ . २ ( बंदुका इ० ) उडणें ; धडाडणें . ३ ( सैन्याचा किंवा नोकरीचा ) पगार ठरल्या वेळीं महिन्याचा महिन्यास मिळणें ; भराभर , एकसारखा पैसा घेण्याचा क्रम सुरू असणें ; अखंड पैसा मिळत असणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP