Dictionaries | References

जाण

   
Script: Devanagari

जाण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : अनुभुती, समज

जाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Knowing, understanding, versed in. 2 Knowing, sensible, intelligent about; that weighs, considers, regards, attends to. Ex. मुक्या- चा जाण कोण होतो? दरिद्र्यांचा जाण विक्रमराजा; जाण मनुष्यावर उपकार केला असतां तो विसरत नाहीं.
Acknowledgment of favors and kindnesses: also appreciation of services or labors. v जाण. Ex. आम्ही श्रम केला पण त्याची त्यानें जाण जाणली.

जाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Knowing.
 f  Appreciation of services, &c.

जाण     

जाणवणी  स्त्री. 
  1. सूचना ; इषारा .
  2. जाणीव . ऐसी होतां जाणवणी - रास १ . १२९ .

वि.  
  1. जाणता ; समजणारा ; निपुण . तरी जाणां नेणां सकळां । - ज्ञा ५ . १६ .
  2. ज्ञानवान ; बुध्दिवान ; वजनदार ; विचारशील . जाण मनुष्यावर संकटीं उपकार केला असतां तो विसरत नाहीं .
  3. लक्ष घालणारा ; मानणारा ; काळजी घेणारा . नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । - तुगा १४९२ . दरिद्र्यांचा जाण विक्रमसजा ।
  4. कृतज्ञ ; प्रत्यौपकारशील . जाण मनुष्यावर संकटीं उपकार केले असतां तो विसरत नाहीं .
  5. सज्ञान ; अज्ञान , अजाण नसणारा . साखरेचा इंद्रावण घडू । जाणा गोड नेणा कडू । - एभा २८ . ४६७ .
  6. भोक्ता ; रसिक . परि सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणीं जें । - माज्ञा १५ . ५९४ . [ सं . ज्ञान ; प्रा . जाण ] ( वाप्र . )

 स्त्री. 
  1. ज्ञान ; ओळख .
  2. कृपा , दया यांची जाणीव , कृतज्ञता ; प्रत्युपकारशील वृत्ति .
  3. नोकरीचा किंवा श्रमाचा गौरव ; गुणज्ञता ; गुणाचें चीज करणें ; गुणग्राहकता . ( क्रि० जाणणें ). आम्ही श्रम केला पण त्याची जाण त्यानें जाणली .

 न. ( गो . ) जिणें पहा .
०असणें   ( म्हैस ) तिला जसजसें खाणें घालावें तसतसें तिचे कासेस अधिक दूध येत असणें .
जाणउ , जाणऊ    ( काव्य . ) जाणों ; असें जाणलें , मानलें जावो ; असा विचार केला जावो .
जाणपण  न. 
  1. ज्ञान ; विद्वता . संतापुढें जाणपण । सर्वथा आपण न मिरवावें । - एभा ३ . ३५७ .
  2. जाणतेपण . जाणपणें न पिएति आंब । - शिशु ८४ .
  3. अस्तित्व . तेवीं द्वंद्वांचें जाणपण जाणवी असे जें ज्ञान । - एभा ३ . ४११ .

जाणवाय  स्त्री. ( गो . )
  1. शहाणपणा .
  2. जाणीव . तो डोळयांनी अधू म्हणायाची जाणवाय ठेव .

जाणवाय वि.   ( गो . ) फाजिल प्रौढी बाळगणारा ; चढेल . तूं फारच जाणवाय झाला आहेस .
जाणसळ , जाणसाळ वि.   चतुर ; जाणणारा ; जाणता पहा .
जाणसळ , जाणसाळ  स्त्री. चातुर्य ; नैपुण्य ; ओळख ; माहिती .
जाणसळणें , जाणसाळणें अ.क्रि   जाणत असणें ; चतुर असणें ; निपुण असणें ; अनुभव आणि व्यवहार असणें ; व्यवहारांत घटणें .
जाणसळणें , जाणसाळणें स.क्रि.  परीक्षा करणें ; कसोटीस लावणें ; अनुभव पाहणें .

जाण     

म्‍हैस जाण असणें
जसजसे खाणे घालावे तसतसे कासेस आधिक दूध येत असणें
काही म्‍हशी कितीहि खाणें घातले तरी शरीराने माजतात पण दूध अधिक वाढवीत नाहीत. उलट काही म्‍हशी जसे खाणें घालावे तसे दूध वाढवितात. अशा प्रकारापैकी दुसर्‍या प्रकाराच्या म्‍हशीस म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP