Dictionaries | References

ठक

   
Script: Devanagari

ठक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A knave, rogue, cheat. Pr. ठकास महाठक भेटला.
The fixedness of astonishment or amazement. Ex. वर्णितां वर्णितां शिणला चक्षु- श्रवा ॥ ठक पडिलें कमलोद्भवां ॥.

ठक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A knave, rogue, cheat.

ठक     

वि.  फसव्या , बनवणारा , भोंदु , लबाड , लुच्चा , वंचक ;

ठक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  फसवून लुबाडणारी व्यक्ती   Ex. त्याच्यासारखा ठक मी पाहिला नाही.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लुच्चा लफंगा
Wordnet:
asmঠগ
benঠগ
gujઠગ
hinठग
kasٹھگ
kokचोर
malവഞ്ചകന്‍
mniꯂꯧꯅꯝ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ
nepठग
oriଠକ
sanवञ्चकः
tamவஞ்சகன்
telమోసగాడు
urdجعلساز , ٹھگ , لٹیرا , دغاباز , فریبی , دھوکےباز
See : लबाड, कृष्ण थिरथिरा

ठक     

ठकडा , ठकडी , ठकडें , ठकडया  वि .  लुच्चा ; सोदा ; फसविणारा ; मोठा ठक . म्हणती ठकडा रे कान्हा । - तुगा २३० . अवघ्या जातीमध्यें ठकडा सोनार । त्या घरीं व्यापार झारीयाचा .
ठकडेपणा  न . फसवेगिरी . तें ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रति सर्वथा । - एभा २९ . ७२८ .
 न . ( काव्य ) तटस्थपणा ; आर्श्चयामुळें येणारी एकाग्रता ;
आश्चर्य ; भूल ; विस्मृति ; दिडमूढता . ( क्रि० पडणें ).
उभा जानकीरमण । वधुसहित सुलक्षण । उभयरूपाचें बरवेपण । पाहाण्या ठक पडिलेसें । - वेसीस्व १० . १२१ . - वि . तटस्थ . [ सं . स्थग , हिं . ठक ; ठग ]
म्ह०
ठकास महाठक भेटला .
 पु. लुंच्चा , फसव्या , धूर्त मनुष्य . ठकउनि लुटावया पटु ठक जेविं ससार्थवाह सार्थातें । - मोसभा ६ . ८९ .
ठकणा , ठकणी वि .  ठकडा पहा . कोण मिळाली ठकणी - अफला ७८ .
ठकणें अक्रि   आश्चर्यचकित होणें . पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें . । - ज्ञा ७ . २०० . [ हिं . ठकना ]
०णूक  स्त्री. फसवणूक ; फसगत ; लुच्चेगिरी ; लबाडीनें केलेली नागवणूक .
ठकणें अक्रि .  
  1. फसणें ; फसले जाणें ; दगा होणें ; निराशा होणें ; बुडणें ( धंद्यात ) चुकणें . माझी ठकली वो बुध्दि । - कथा १ . ५ . १४२ .
  2. ( चुकीनें ) थकणें ; दमणें ; श्रम होणें किंवा पावणें ; बंद राहणें ; सपणें ; सरणें ; अंतरणें . जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राध्द न ठके । - ज्ञा १७ . १८६ .

ठकणें सक्रि .  ( कों . ) दगा देणें ; नाडणें ; ठार मारणें ( असावध किंवा पूर्व तयारी नसतां , सापाच्या दंशानें किंवा चोरांनीं हल्ल्यांत ).
०धंदा  पु. फसवेगिरी ; सोदेगिरी ; लुच्चेगिरी ; लुच्चेपणाचा व्यवहार .
०बाज वि.  ठक अर्थ १ पहा . [ हिं . ]
०बाजी  स्त्री. १ ठकधंदा पहा . २ ( कायदा ) कोणा मनुष्यास फसवून त्याचा माल देण्याविषयीं त्याचें मन वळविणें . [ हिं . ]
०वणी   ठकवणूक - स्त्री . ठकधंदा पहा .
०वरा वि.  ठकविणारा ; लुच्चा . ठक अर्थ १ पहा .
ठकवा , ठकव्या , ठकाऊ , ठकारू , ठकावू , ठकू वि .   ठकवरा पहा .
ठकवाठकव  स्त्री . नानाप्रकारची फसवणूक . ठकवणी पहा . [ ठकविणें ]
०विणें   सक्रि . फसविणें ; लबाडी करणें . सुरांअसुरांतें ठकवूनी । महादेव मोहिला । - एरुस्व २ . १९ . [ ठकणें ]
०विद्या,ठकूविद्या  स्त्री  फसविण्याची कला ; कपटयुक्ति ; लबाडी ; ठग लोकांचें चातुर्य .
०व्याज  न. फसवून घेतलेलें व्याज ; अमर्याद व्याज .
०व्यापार  न. कपटाचा व्यापार , धंदा उद्योग .
०सौदा  पु. 
  1. गिर्‍हाईकास ज्या वस्तूनें किंवा मालानें फसविण्यांत आलें तो माल .
  2. ठकव्यापार पहा .

ठक     

ठकविद्या
ठकूविद्या
फसविण्याची कला
ठकविण्याची विद्या
लबाडी
सौदेगिरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP