|
न. १ घोडें बांधण्याची जागा ; तबेला ; गोठा . तानाजी सुभेदार जैसा ठाणांत । - ऐपो ५२ . २ बाण मारतेसमई उभें राहण्याचा एक प्रकार ; ( एक गुडघा जमीनीवर टेंकून इ० ) शरीराची ठेवण , पवित्रा . करीं धनुष्यबाण अंतरी बिंबलें ठाण । - दावि १६४ . ३ महालांतील मुख्य गांव , ठाणें . ४ स्थान ; जागा ; प्रदेश . पावे जैसा चिंतिलें ठाण । धक्का ; ठिकाण ; जागा ; आसन ; बैठक ( घेतलेले , राखलेलें , टाकलेलें , गमाविलेलें इ० ). ( या अर्थी क्रि० चालणें ; ढळणें ; हालणें ; डगडगणें = आसनावरचें स्थैर्य नाहीसें होणें चालणें ; ढळणें ; हालणें ; डगडगणें = आसनावरचें स्थैर्य नाहींसें होणें ( - विशेषत : घोडयावरील ); ( ल . ) आपल्या स्थानावरून घसरणें ; डळमळणें . ठाण न चळे रणींहून । ५ ( ल . ) धैर्य . ६ आकृति ; शरीराचा आकार किंवा बांधा . तुझें ठाण केवढें । - ज्ञा ११ . २७४ . [ सं . स्थान ; फ्रें . जि ठन ] ( वाप्र . ) न. कापडाचा तागा . ०मांडणें आसन सोडणें ; पलायन करणें ; तळ सोडणें ; खुंटा उपटून ( घोडयानें ) पळून जाणें . सामाशब्द - ठाणई - स्त्री . ( व . ना . ) लांकडाची समई ; वर पणती ठेवण्याची लांकडी घडवंची . टाणक - न . ठिकाण ; स्थान ; उतरण्याची किंवा राहण्याची जागा ( ठाणें शब्दासारखा हा फारसा प्रचांरांत नाहीं ); किरकोळ व ग्राम्य देवतांचें ठिकाण ; देवस्थान ; देऊळ . जागोजागीं खंडोबाचीं ठाणकें आहेत . ठाणगा - पु . १ ( कों . ) किल्ल्यांतील नायकवडी ( किल्लेदाराच्या हाताखालचा ). २ तालुक्याच्या ठाण्यांतील जमाबंदीकडील शिपाई . ३ ठाणेदार . ४ ( व . ) वस्ताद ; ठक ; फसव्या . ०ठकार न. शरीराची ठेवण . ठाणठकारें अति उत्तम । - एभा ६ . ४९ . ०दिवी स्त्री. ठाणवई ; ठाणई ( लांकडी किंवा लोखंडी ). तेचि करूनि ठाणदिवी । - ज्ञा ६ . २३ . ०पट्टा पु. ठाणास बांधावयाचा पट्टा , दोर . ठाणपट्टा व मुजाम नरम असावेत । - अश्वप १ . १२२ . ०बंद बंदी ठाणेबंद ठाणेबंदी - स्त्री . पशूची ठाणावरील कोंडणूक , अडकवणी . - वि . ठाणावरच नेहमीं बांधून ठेवलेला ( घोडा इ० ). [ हिं . ठाणबंद ] ०माण न. ( काव्य . ) शरीराचा बांधा , ठेवण , आकृति , ढब , तर्हा . सिंहाकृति ठाणमाण । - मुआदि १६ . ८२ . ०वई ठाणवी - स्त्री . १ ठाणई पहा . हेमठाणवायावरी जडित तबकें । - मुआदि ४२ . ६२ . २ ( ल . ) खुजट बाई किंवा मुलगी .
|