|
पु. भात शेतांतील तण . - चित्रकृषि . २ . ६ . न. ( कु . ) स्पष्टार्थ . [ ताठ ? ] न. गोणपाट . - शर . ताटूक पहा .[ तरट ] ( लिहिण्याच्या चुकीने तरट चा ताट शब्द बनला असेल ? ) स्त्री. ( क्व . ) शेर , साबर इ० कांसारख्या जिवंत झाडाचे कुंपण . हा शब्द स्वतंत्रपणे क्वचितच वापरतात . साधारणतः शेरताट , साबरताट अशासारख्या समासांत वापरतात . [ ताटी ] न. अजमासे पांच रुपये किंमतीचे सोन्याचे एक नाणे . पुतळीचे ताट असाहि प्रयोग करतात . ताट अर्थ ४ पहा . न. ताजवा , कांटा बरोबर नसल्याने वजनांत होणारी तफावत , अशुद्धता , अंतर . ताठ अर्थ ३ पहा . न. १ जेवण इ० कांच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातुमय पात्र ; तबक . सुचिर क्षुधित ब्राह्मण हां हां म्हनतांहि वाढिल्या ताटी । - मोकष्ण २२ . ८६ . २ फांसा , नाके इ० विरहित अशी पुतळी , ताट , पुतळीचे ताट असेहि म्हणण्याचा प्रघात आहे . [ का . तट्टे ] ( वाप्र . ) ताटाला बसणे - जेवायला बसणे . आता ह्या सर्व मंडळींनी आमच्या बरोबरच ताटाला बसावे अशी माझी इच्छा आहे . - स्वप १२९ . ताटावरचे पाटावर , पाटावरचे ताटावर - श्रीमंतीचा डौल ; श्रीमंताच्या बायका काम न करता आळसांत व चैनीत वेळ घालवितात . त्यावरुन हा वाक्प्रचार या अर्थी रुढ झाला . ताटावरुन ओढणे - उठविणे - ( एखाद्यास ) जेवतां जेवतां उठविणे ; ( एखादा ) जेवीत असताना त्याचा अपमान करुन त्याला उठविणे ; - म्ह ० ताटांत सांडले काय आणि वाटीत सांडले काय एकच . = जेवताना एखादा जिन्नस ताटांत काय किंवा वाटीत सांडला काय एकच . कारण तो जेवणार्याच्या पोटांतच जाणार . यावरुन जेथे दोघांचे हिताहित एक असते तेथे त्यापैकी एकाला फायदा झाला काय किंवा दुसर्याला फायदा झाला काय सारखच . संभाजी राजे व व्यंकोजी राजे कोणी परके नाहीत . त्यांच्याकडे असलेला मुलूख आपल्याकडेच असल्यासारखा आहे . ताटांत सांडले किंवा वाटीत सांडले काय एकच . - बाजीराव . २ ताटाबरोबरकाठ = जुगार इ० कांत उधळून दिलेला बराच मोठा ऐवज परत मिळण्याच्या प्रयत्नांत उरलासुरला ऐवज खर्च करुन टाकणे . ३ सोन्याचे ताट परंतु कुडाचा आधार - आश्रय - उठिंगण = स्वतः चांगला अब्रूदार पण कुसंगतीत असलेला मनुष्य ; हलक्या माणसाच्या मुठीत राहणारा चांगला मोठा मनुष्य ; चांगला पण अकुलीन माणूस . सोन्याचे ताट झाले तरी त्यास कुडाचे उठिंगण पाहिजे . - पेब ४ . वाडबाबा २ एका ताटी जेवणे आणि घांस मोजणे . सामाशब्द - न. १ ( जोंधळा , बाजरी इ० काचे ), उभे , जिवंत रोप . २ जोंधळा , बाजरी , बोरु इ० काचे कांड , काठी . पोरे न सांगती , पाळती । त्यांसी जाची नानागती । एक मुलावरी बैसे श्रीपती । ताट हाती घेवूनियां । - ह ७ . २२१ . [ ताठ , ताड ? ] न. खरबुजाची एक जात ; हे आंतून तांबूस असून आकाराने चपते असते . - कृषि ५७२ . ०काढा ढ्या वि . उष्टे काढणारा . मी दासु किंकरु तुझे । देविका - ताट - काढा हे ब्रीदु माझे । - शिशु ७६ . [ ताट + काढणे ] ०पाट पुअव . ताटे , पाट इ० मांडून केलेली जेवणाची तयारी . ताटपाटाची वेळ असून तशी तजवीज लागू न शकल्यास मेजाची ठेवावी . -( बडोदे ) स्वारीनियम ७६ . [ ताट + पाट ] ०फळे न ( गो . ) ताटे ठेवण्याची फळी . [ ताट + गो . फळे = फळी ] ०शिंगार र्या वि . ( उ . ) पंक्तिपठाण ; आयते खाणारा ; खायाला आधी व कामाला कधीमधी याप्रमाणे वागणारा . [ ताट + शिंगारणे = श्रृंगारणे , शोभा आणणे ] म्ह ० आयतमार्या आणि ताट शिंगर्या . ताटाखालचे मांजर न . पूर्णपणे आज्ञांकित मनुष्य ; पित्त्या ; बगलबच्चा ; ओशाळा ; मिंधा . ते ताबडतोब शांततेच्या ताटाखालची मांजरे होऊन जातील , असा सिद्धांत कशावरुन काढला तो ! ! नाकु ३ . ४३ . ताटेतबके नअव . ( व्यापक ) ताटे , तबके वगैरे . [ ताटे + तबके ]
|