|
न. स्वर्ग , मृत्यु व पाताल हे तीन लोक ; त्रैलोक्य ; त्रिजगत . कां तीर्थे जिये त्रिभुवनी । - ज्ञा १ . २६ . [ सं . त्रि + भुवन = लोक , जग ] त्रिभुनकीर्ति ( रस )- पु . १ एक आयुर्वेदीय मात्रा . हिंगूळ , बचनाग , सुंठ , मिरी , पिंपळी , टाकणखार व पिंपळमूळ ही समभाग घेऊन , एकत्र करुन व खलून झालेल्या मिश्रणास तुळशीचा रस , आल्याचा रस व धोत्र्याचा रस यांच्या तीन भावना ( पुटे ) द्याव्या म्हणजे हा रस तयार होतो , हा ज्वर व सन्निपात यांचा नाश करितो . - योर १ . ३७४ . त्रिभुवन गोसावी - पु . शंकर , राम व दत्तात्रेय हे अवतार किंवा मच्छिंद्रनाथ , जालंधरनाथ अथवा एखादा विख्यात साधुपुरुष ह्याच्या संबंधी योजावयाचा शब्द . तो राम त्रिभुवनगोसावी । काय एक करुं न शके । [ त्रिभुवन + गोसावी ]
|