|
दुपती , दुपते इ० पहा . शास्त्रांची दुभती । पोसिती घरी । - ज्ञा १३ . ११३० . दुर्लभ लोकी जसे सुरभीचे दुभते । - मोकृष्ण ४४ . ३ . [ सं . दुह ] न. १ ( व्यापक ) दुध देणारे , घरी पाळलेले जनावर . २ दूध , दही , तूप इ० . ३ दूध काढणे , विरजण लावणे , लोणी काढणे इ० काम ; दुधाबाबत कामकाज . तुमच्या घरी दुपते कोण करतो ? ४ ( ल . ) ज्याकडे सदासर्वदा पाहिले पाहिजे , ज्याची अत्यंत काळजीपूर्वक निगा ठेवावी लागते अशी गोष्ट , धंदा , मूल , दुखणे इ० . [ सं . दुह ]
|